शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा जिल्हाध्यक्ष अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:38 IST

वसई विरार भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी मयत पत्नीच्या नावे वेगवेगळ््या तारखांचे दोन मृत्यु दाखले तयार केले

शशी करपे ।वसई : वसई विरार भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी मयत पत्नीच्या नावे वेगवेगळ््या तारखांचे दोन मृत्यु दाखले तयार केले. त्यानंतर दुसºया पत्नीला मयत पत्नीच्या जागी उभे करून उपनिबंधक कार्यालयात एक दस्तऐवजाची नोंदणी केली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार करूनही गुन्हा दाखल न केल्याने आमदार सुनिल तटकरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडल्याने जिल्हाध्यक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत.भाजपाचे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष सुभाष साटम यांनी एका गाळ््याची दस्तनोंदणी करण्यासाठी आपली मयत पत्नी सुवर्णा साटम यांच्या जागी दुसरी पत्नी अर्पिता साटम यांना उभे करून उपनिबंधकांकडे दस्तऐवज नोंदणी केली होती. त्यासाठी साटम यांनी मयत पत्नीला दोन वेळा मृत्यु दाखवून वसई विरार महापालिकेकडून दोन वेळा मृत्युची दाखले काढल्याची खळबळजनक तक्रार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी पोलिसांकडे केली होती. यात रामभाऊ म्हाळगी सहकारी पतसंस्थेची आर्थिक फसवणुक झाल्याची तक्रारही गुंजाळकर यांनी केली होती.सुभाष साटम यांची पत्नी सुवर्णा साटम यांचा २८ एप्रिल २००३ रोजी मृत्यु झाला होता. त्यानंतर साटम यांनी डॉक्टरांचे मृत्यु प्रमाणपत्र जोडून महापालिकेतून १४ मे २००३ रोजी मृत्यु दाखला घेतला होता. त्यानंतर साटम यांनी सदर गाळ््याची दस्तनोंदणी २००६ रोजी उपनिबंधक कार्यालयात केली होती. त्यावेळी दुसरी पत्नी अर्पिता साटम यांना मयत पत्नीच्या नावाने उभे करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे सुभाष साटम यांनी पहिली पत्नी १५ आॅक्टोबर २०११ रोजी मयत झाल्याचे मृत्यु प्रमाणपत्र दुसºया एका डॉक्टरकडून घेऊन वसई विरार महापालिकेच्या कार्यालयातून १८ डिसेंबर २०१२ रोजी दुसरा मृत्यु दाखला घेतला होता.भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी आपली पहिली पत्नी दोन वेळा मृत्यु दाखवून दोन वेगवेगळे मृत्यु दाखले घेऊन महापालिकेची फसवणुक केल्याने त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गुंजाळकर यांनी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. पण, सहा महिन्यात पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे आमदार सुनील तटकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. ती शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आली आहे.>पोलिसांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करणे आवश्यकराजकीय दबावाखाली कारवाई न करणाºया पोलिसांनी राज्य सरकारला तक्रार गुंजाळकर जबाव देण्यासाठी हजर न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती कळवली आहे.याबाबतीत गुंजाळकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.गुंजाळकर यांनी याप्रकरणी महापालिकेची फसवणुक झाल्याने महापालिकेने गुन्हा दाखल करावा अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. बोगस दस्ताऐवज करणाºया बिल्डरांविरोधात महापालिका स्वत: गुन्हा दाखल करते. साटम यांनीही बोगस कागदपत्रे तयार करून महापालिकेची फसवणुक केली आहे.त्यामुळे महापालिकेने साटम यांच्यासह बोगस मृत्यु प्रमाणपत्र देणाºया डॉक्टरांवरही कारवाई करण्याची मागणी गुंजाळकर यांनी केलीआहे. या प्रकरणी वसइ विरार महानगरपालिका प्रशासन काय कायवाई करते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.