विरार : येथील पिंपळवाडी परिसरात एका पिसाळलेल कुत्र्याने चार मुलांना चावे घेऊन त्याने गंभीर जखमी केले. त्यांच्यावर वेगवेगळ्या हॉस्पीटलमध्ये उचपार सुरु आहेत. मनन गोपाळ कोठारी (६), चिराग संतोष पाटील (१४), प्रकाश बांमळे (३) गोपाल प्रकाश बांमळे (९) यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. यातील मननच्या गालावर चावा घेऊन तिला जबर जखमी केले आहे. तिच्यावर हॉस्पीटलमध्े उपचार सुरु आहेत. तर चिराग, प्रकाश आणि पालवर कांदीवली येथील शताब्दी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. याच कुत्र्याने याआधीही अनेकांवर हल्ले केले आहेत. तसेच काही कुत्र्यांनाही जखमी केले आहे, अशी माहिती पराग घरत ांनी दिली. (वार्ताहर)
विरारमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा चार मुलांना चावा
By admin | Updated: February 29, 2016 01:40 IST