वसई : महावितरण कल्याण परिमंडळातील सर्व वीज बिल भरणा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार असून ग्राहकांनी वेळेत आपली बिले भरून गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.महावितरणची थकबाकी वसुली मोहिम राज्यभर सुरु असून थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी वीज बील भरणा केंद्रे या आठवड्यात असलेल्या सलग सुुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.
सुटीच्या दिवशीही बिलभरणा केंद्रे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:30 IST