संजय नेवे, विक्रमगडया नगर पंचायतीच्या रिंगणातून १७ उमेदवारांनी आज माघार घेतल्याने आता १७ वॉर्डांसाठी ६० उमेदवार उरले आहेत. कोण कुणाशी लढणार किती उमेदवार रिंगणात राहणार अशा असंख्य प्रश्नाला आज पूर्ण विराम मिळाला आहे. यामुळे शनिवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात होणार आहे. मतदारांचा गोंधळही कमी होऊन त्याला कुठल्या पक्षाचा उमेदवार कोण हे कळू शकणार आहे. या निवडणुकीसाठी १०४ उमेदवारांनी े अर्ज दाखल केले होते त्यातील २५ अर्ज छाननीमध्ये अवैध ठरवल्यानंतर १७ जागांसाठी ७७ उमेदवार रिंगणात होते त्यातील १७ जणांनी आज माघार घेतल्याने ६० जण अंतिम लढतीत आहेत. अनेक प्रभागांमध्ये सर्वच पक्षांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला माघार घेण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवली त्याचाच परिणाम होऊन १७ जणांनी माघार घेतली आहे. तरीही सर्वत्र बहुरंगी लढती होणार आहेत. ४९ रिंगणात रविंद्र साळवे, मोखाडा२७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या नगर पंचायतिच्या १७ प्रभागांमध्ये होणाऱ््या निवडणुकीतून शुक्रवारी ६० पैकी ११ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता ४९ उमेदवार रिंगणात असून प्रभाग क्रमांक ९ मधील सेना आणि राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचे प्रकरण तिसऱ्या अपत्याबाबत न्याय प्रविष्ट आहे. सेना १५ भाजपा, ११ काँग्रेस ५ ,राष्ट्रवादी ६ असे उमेदवार उभे केले आहेत. तसेस बविआ १ , आरपीआय+ मनसे १ उमेदवार उभे आहेत.ठोकले ५८ जणांनी शड्डू, कॉ.राकॉ, सेना स्वबळावर सुरेश काटे, तलासरीतलासरी नगर पंचायतीच्या निवडणुकी साठी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस पण आज कोणीही माघार न घेतल्याने सर्व ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले . भाजपा व माकपा ने सर्व सतरा वार्डात उमेदवार उभे केले असून ते आपल्या ताकदीवर स्वबळावर निवडणूक लढवित आहेत भाजपा व शिवसेनाची युती पण तलासरीत शिवसेनेची ताकद नसल्याने भाजपने शिवसेनेला जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने शिवसेना स्वबळावर लढत आहे शिवसेनेने सात ठिकाणी उमेदवार उभे केले तलासरीत शिवसेना प्रथमच निवडणूक लढवित आहे व उमेदवार उभे केले हे महत्वाचे. तलासरी नगर पंचायती च्या निवडणूक आता चौरंगी होणार असून आज पासून निवडणूक प्रचाराला खरी सुरु वात होणार आहे .अठ्ठावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून निवडणुकीचा धुराळा आता उडणार. तसेच काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांना त्यांची राजकीय ताकद काय आहे हेही कळून येणार आहे.
विक्रमगडात १७, मोखाड्यात ११ जणांची माघार, तलासरीत सगळेच राहिले रिंगणात
By admin | Updated: November 12, 2016 06:19 IST