शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

महिला सक्षमीकरणासाठी बाइक रॅली

By admin | Updated: March 15, 2016 00:59 IST

महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेचा नारा देत सुमारे २५० हून अधिक महिला व पुरूष बाईकस्वारांनी रविवारी वसईत रॅली काढली. नवभारत को-आॅप. क्रेडीट सोसायटी आणि वसई-विरार

वसई : महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेचा नारा देत सुमारे २५० हून अधिक महिला व पुरूष बाईकस्वारांनी रविवारी वसईत रॅली काढली. नवभारत को-आॅप. क्रेडीट सोसायटी आणि वसई-विरार महानगर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या जागृतीपर प्रचार रॅलीस रॉयल थम्स आणि बर्न या दोघा बाईक रायडर्सच्या ग्रुपने विशेष सहाय्य केले. या रॅलीच्या निमित्ताने वसईच्या रस्त्यावर स्त्री-शक्ती बाईकस्वार होऊन धावली. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या बाईक रॅलीला वसईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वसई रोड रेल्वे पूलाजवळ पूर्वेच्या चिमाजी आप्पा उद्यानाजवळ विरार, बोळींज, नालासोपारा व तालुक्यातून विविध गावातून आलेले बाईकस्वार एकत्र झाले. रॉयल थम्स ची रायडर्स चैताली कापडी हिच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक निकम यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ झाला. वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे, लेखक अरविंंद म्हात्रे, सदिच्छा सेवा मित्र मंडळाचे राजाराम बाबर, सोसायटीचे सचिव नरेंद्र राऊत आदी उपस्थित होते. चार वर्षांपूर्वी ४० बाईकस्वारांच्या सहभागाने महिला दिनानिमित्त सुरू केलेली ही रॅली दरवर्षी अधिक मोठी होत असून महिलांचा सहभाग सतत वाढत आहे. पुढील ५ व्या वर्षी महिलादिनी व्यापक प्रमाणात रॅली काढणार असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन नितीन म्हात्रे यांनी प्रास्ताविकात दिली. नवघर-माणिकपूर शहर व पापडी मार्गे जात वसई किल्ल्यातील नरवीर चिमाजी आप्पांच्या स्मारकाजवळ आलेल्या या रॅलीचे ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र पाटील व किरण शिंदे यांनी या रॅलीचे येथे स्वागत केले. यावेळी सोसायटीचे व्यवस्थापक संजय पंडीत, महिला कार्यकर्त्या नयना वर्तक प्रामुख्याने उपस्थित होते. रॅलीत सहभागी झालेल्या बाईक रायडर्स व उपस्थितांचे आभार मानून, पुढील वर्षी संस्मरणीय व सर्वसमावेशक अशी भव्य रॅली काढण्यासाठी विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही समारोप प्रसंगी पत्रकार संघाच्या अध्यक्षांनी दिली. धवल म्हात्रे, धृवाली वर्तक, हार्दिक म्हात्रे, संजय पंडीत व किरण शिंदे यांनी रॅलीच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)