तलवाडा : येथील वेहेलीपाड्यातील विठ्ठलनगरात गेले तीन दिवस मोठ्या भक्तीमय वातारणारत सुरु असलेल्या बोहडा अर्थात पारंपारिक जगदंबा यात्रेची सांगता रंगपंचमीच्या रात्री मोठ्या उत्साहात झाली. रात्री आठ ते रात्री आठ या काळात देवळा पुढे मान-पान, देवी पुढे गाऱ्हाणे अन् पारंपारिक सोंगे नाचवून मोठा बोहड करण्यात आला. या निमित्ताने जव्हार, माखाडा व वाडा आदि भागातून हजारो भक्त होते.आदिवासींच्या अनेक बोली भाषांतील बोहाडा म्हणजेच परंपरागत जगदंबा यात्रोत्सवासाठी दहा हजार भक्तांनी देवीला मान दिल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यत देवदेवतांची सोंगे नाचविण्यांत आल्याचे येथील जयभवानी मित्र (विठठलनगर) मंडळाकडून सांगण्यात आले. या यात्रोत्सवाला पंचायत समिती सदस्य, जि़ प़ सदस्य, सरपंच त्याचबरोबर विविध क्षेत्रातील व्यापारी आणि, पत्रकार आदींनी भेट दिली़ त्यांचे यावेळी मंडळाकडून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यांत आले़ स्वंतत्र इतिहास असणारी आदिवासी समाजाची संस्कृती ही मानवी मूल्यांवर आधारित आहे़ आदिवासी समाजात लोककलेला फार महत्व आहे़ पारंपारिक नृत्यकला त्यांच्याकडे आहेत़ तसेच अनेक बोलीभाषाही आहेत़ त्या संस्कृतीमधील बोहाडा पाहण्यासाठी वेहलपाडयाच्या तसेच तालुक्यातील पंचक्रोशीतील लोक, आदिवासी बांधव लांबलांबून आपल्या कुटुंब कबिल्यासह आले होते़ प्रारंभी गजाननाला वंदन करुन त्यांचे सोंग(मुखवटा)नाचवला जातो़ त्यानंतर सरस्वती विष्णु आणि पुराणातील देवदेवतांना तसेच देवदेवतांच्या युध्दांचे प्रसंग सोंगे नाचवुन भक्तिभावाने सादर केले जातात़ या जल्लोशाच्या वातावरणात आदिवासी अगदी तल्लीन झालेले दिसत होता़ विविध सोंगे नाचवून देवतांच्या अनेक प्रसंगांचे सादरीकरण करण्यातच पहाट होते़ त्यानंतर जगदंबा मातेची विधीवत पूजा करुन व आदी शक्ती व महिषासुर यांच्या युध्दांचे सोंगे नाचविले गेले पाहिजे. गावात रोगराई, संकटे येऊ नयेत म्हणूनच आदिवासी हा बोहाडा जगदंबा यात्रोत्सव साजरा करतात़
मोठा बोहडाने जगदंबा यात्रोत्सवाची सांगता
By admin | Updated: April 4, 2016 01:50 IST