शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे होणार भूमीपूजन; पावसामुळे प्रशासनापुढे आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 09:34 IST

२७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळी वारे याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने ३० ऑगस्टचा पंतप्रधानांचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान शासन आणि प्रशासनापुढे उभे राहिले आहे.

पालघर : वाढवण बंदराच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑगस्ट रोजी पालघर येथे येणार असल्यामुळे त्यांच्या सभेसाठी बनविण्यात आलेला मंडपाचा एक भाग पहाटे आलेल्या वादळी वारा आणि तुफान पावसात उडून रस्त्यावर पडल्याचे दिसून आले. २७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळी वारे याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने ३० ऑगस्टचा पंतप्रधानांचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान शासन आणि प्रशासनापुढे उभे राहिले आहे.

केंद्र शासनाच्या बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आणि राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत वाढवण बंदराचे भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३० ऑगस्ट रोजी पालघर येथे येत असून त्यांच्यासोबतच राज्यपाल सीपी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय बंदर मंत्री सदानंद सोनोवाल केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग केंद्रीय बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर केंद्रीय मत्स्यपालन पशुसंवर्धन राज्यमंत्री एस पी सिंग बघेल केंद्रीय मत्स्यपालन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.      या कार्यक्रमाला सुमारे ५० हजार लोक येणार असल्याचे अपेक्षित असून १००० वाहने येणार असल्याच्या शक्यतेमुळे जिल्हा प्रशासन सर्व व्यवस्था करण्यात युद्ध पातळीवर साशंकता व्यक्त केली जात आहे मात्र मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यांच्या अनेक अडचणी ह्या कामांमध्ये येत असल्याने ३० ऑगस्ट पर्यंत हेच काम पूर्ण होईल का? ह्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

सोमवारी पहाटे पाच वाजता जोरदार वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी मंडप उभारण्याचे काम सुरू असताना मंडपाच्या लोखंडी साहित्याचा भाग उडून सुमारे २०० फूट लांब पालघर- बोईसर रस्त्यावर येऊन पडला. ह्या लोखंडी साहित्यामुळे पालघर बोईसर रस्त्यावरची वाहतूक धीम्या गतीने सुरू होती मात्र तीन तास उलटून गेल्यानंतरही हे साहित्य रस्त्यावरून बाजूला करण्यात आले नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :palgharपालघरNarendra Modiनरेंद्र मोदी