शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

मजुरीसाठी ‘भीक माँगो’

By admin | Updated: December 23, 2016 02:50 IST

मोठमोठया निधीची कोरडी आश्वासने देऊन सत्तेवर बसलेल्या भाजपा सरकारकडे रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या

पालघर : मोठमोठया निधीची कोरडी आश्वासने देऊन सत्तेवर बसलेल्या भाजपा सरकारकडे रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या गरीब मजुरांची काही हजार रुपयांची मजुरी देण्यासाठीही पैसे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत असलेला खडखडाट काहीअंशी कमी करण्यासाठी पालघर मध्ये आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने भीक मांगो आंदोलन करून ६ हजार ५९१ रु पयांचा जमवलेला निधी शासनाकडे सुपूर्द करण्यात आला.आज पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेने एक अभिनव आंदोलन करून सरकारच्या कुचकामी धोरणाचा पार पंचनामाच केला.वाडा पंचायत समिती स्तरावरुन आंबिटघर ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय योजने अंतर्गत शाळेच्या मैदानाच्या सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्याकामातील मस्टर क्र मांक ४०३२ मध्ये ३१ मजुरांना प्रत्येकी देय रक्कम म्हणून ७६० रु पये असे एकूण १९ हजार, मस्टर क्र मांक ४०३३ मध्ये ६ मजुरांना प्रत्येकी ७६० प्रमाणे एकूण ३ हजार ८०० रु पये तर मस्टर क्र मांक ४०५१ मध्ये ३१ मजुरांना प्रत्येकी ११५२ प्रमाणे ३५ हजार ७१२ रु पये प्रमाणे एकूण रक्कम ६८ मजुरांचे ५८ हजार ५१२ रु पये इतकी रक्कम राज्यशासनाकडून अनेक वेळा मागणी करूनही दिली गेली नाही. मजुरांना देण्यात यावयाची ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत जमा करण्यात आलेली नसल्याचे लेखी उत्तर वाडा पंचायत समिती कडून देण्यात आले असल्याचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितले. अशा अनेक घटना पालघर जिल्ह्यातील गावा गावात आढळून येत असल्याने आदिवासी समाजातील मजुरांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. पुरेसा रोजगार ही स्थानिक पातळीवर निर्माण करू दिला जात नसल्याने नाईलाजाने विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा ई. तालुक्यातील हजारो मजूर आपल्या कच्च्याबच्यांसह स्थलांतरीत झाले आहेत.रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी बाबत कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी रोहयो सह कातकारींचे रेशनकार्ड, बँकेतील चलन तुटवडा, वनहक्क दावे, घरकुल, आणि नगरपंचायत हद्दीतील मजुरांना रोहयो ची काम मिळत नाहीत या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी रोहयो च्या कामाची मजुरी देण्यासाठी शासन पातळी वरून कोटी ७८ लाख रु पयांची रक्कम आली असून मजुरांना लवकरच त्याचे वाटप होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी संघटनेने जमा केलेला निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणार असल्याचे श्रमजीवी ने सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, उपजिल्हाधिकारी नवनाथ जरे, जिल्हा माहिती अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थिती होते. यावेळी श्रमजीवीचे विजय जाधव, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, उल्हास भानुशाली, गणेश उंबरसाडा, सरिता जाधव, दिनेश पवार, कैलास तुंबडा, रेखा धांगडे, मिलिंद थुले,मनोज काशीद, बाळाराम पडोसा, बजरंग वळवी, सुरेश बरडे, दिलीप लोंढे, निलेश वाघ, विशाल घाटाळ, मनीष भानुशाली, आणि इतर पदाधिकारी सहभागी होते. (प्रतिनिधी)