शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भालिवली रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा!

By admin | Updated: January 13, 2017 05:40 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मौजे भालिवली येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाला आहे

पारोळ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मौजे भालिवली येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाला आहे. याबाबत आयआरबी प्रशासनाला अनेकदा आठवण देऊनही ती त्याचे काम सुरु करण्यास चालढकल करीत आहे. भालिवली हा एक असा नाका आहे की, महामार्गाच्या विभागलेल्या रस्त्यावर भालिवली व त्याच्या पुढे पुन्हा विभागलेल्या एका रस्त्यावरून , बेलवाडी, पाचरु खे , मडकेपाडा, किणी पाडा, तरे पाडा व दुसऱ्या रस्त्यावर जांभूळ पाडा, नवसई, भाताणे, आडणे, थळ्याचा पाडा आदी गावांव्यतिरिक्त अनेक पाडे व वस्त्या आहेत. यामध्ये खानिवडे प्रतिभा विद्यामंदिरात , बेलवाडी शासकीय आश्रम शाळेत येणारे व महाविद्यालयीन शिक्षणासाठी चांदीप, वसई, विरार येथे जाणारे हजाराच्या आसपास विद्यार्थी आहेत. तसेच भाताणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने तेथे उपचारार्थ जाणारे-येणारे रुग्ण, शेतकरी, कष्टकरी, सोमवार व गुरु वारच्या आठवडे बाजारात येणारे जाणारे बाजारकरू, सातिवली , पेल्हार विरार वसई येथील छोट्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार तसेच रिसॉर्टमध्ये येणारे पर्यटक तसेच तीन गावांसाठी असलेली महामंडळाची बस सेवा आदींना हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग जीव मुठीत घेऊन ओलांडावा लागत आहे. यामुळे आजतागायत या ठिकाणी बरेच अपघात झाले आहेत. यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला असून कित्येक जणांना कायमचे अपंगत्व आले. तरी या पूलाचे बांधकाम सुरु होत नाही. त्यामुळे अजून किती अपघात घडून बळी गेले म्हणजे आयआरबी या पूलाचे बांधकाम सुरू करेल असा संतप्त सवाल येथील प्रवासी व रहिवासी करीत आहेत. (वार्ताहर)याबाबत अनेकदा तक्र ारी केल्यानंतर १५ दिवसांपूर्वी येथे काम चालू केले होते. मात्र काहीच अंतरावर असलेल्या टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण आयआरबी बांधकाम प्रशासनाने देऊन काम थांबवले आहे . मात्र हे कारण संयुक्तिक नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने दिरंगाई टाळून उड्डाण पुलाचे काम सुरु करणे आवश्यक आहे. अन्यथा गावकरी टोल नाका बंद पाडणार असून पुढे उचलणार असलेल्या पावलास आयआरबी प्रशासन जबाबदार असेल .- नरेंद्र पाटील, माजी उप सभापती पं.स. वसई काही अडचणींमुळे काम बंद आहे हे जरी खरे असले तरी ते येत्या दोन ते तीन दिवसात पूर्ववत सुरु होणार आहे . ’’- अमित साठे, आयआरबी बांधकाम अधिकारी