शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

जरा जपून, नव्या योजनेसाठी वसईत आज पाण्याचा ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 11:48 IST

वसई-विरारकरांसमोर सध्या पाणीटंचाईचे विघ्न असले तरी शुक्रवारचा ब्लॉक हा वसईकरांची पाणीटंचाई दूर करणार आहे. त्यामुळे आजचा पाण्याचा ब्लॉक वसईकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

पारोळ : वसई-विरार शहर महानगरपालिकेला जाणवणारी पाणीटंचाई या महिन्याच्या अखेरीस दूर होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या नव्या पाणी योजनेत वसईकरांना अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा वितरित होणार आहे. या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी वसईत शुक्रवारी पाण्याचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. वसई-विरारकरांसमोर सध्या पाणीटंचाईचे विघ्न असले तरी शुक्रवारचा ब्लॉक हा वसईकरांची पाणीटंचाई दूर करणार आहे. त्यामुळे आजचा पाण्याचा ब्लॉक वसईकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

वसई-विरार शहर महानगरपालिकेस सूर्या टप्पा-१ व ३ या योजनेतून २०० द.ल.ली. प्रतिदिन पाणी उपलब्ध होत असून महानगरपालिकेस १४० द.ल.ली. पाण्याची तूट भासत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूर्या प्रकल्पातून ४०३ द.ल.ली. पाणी वसई-विरार शहर महानगरपालिकेस १६५ द.ल.ली. पाण्यापैकी ८० ते ९० द.ल.ली. पाणी काशिदकोपर  येथे जुलै २०२३ च्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाढीव पाणी शहरात वितरित करण्याच्या दृष्टीने सूर्या योजनेतील मुख्य जलवाहिनीस काशिदकोपर शुक्रवार २३ जून रोजी जोडणीचे काम केले जाणार आहे. तरी या कामाकरिता सूर्या टप्पा-१ व टप्पा ३ या योजनेतून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा २३ जून रोजी १२ ते १८ तास बंद ठेवण्यात येणार आहे. याकाळात वसई-विरार परिसरात पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांची गैरसोय होईल, मात्र हे काम नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. हे जोडणीचे काम झाल्यावरही जलदा चाचणी व वॉशआऊटकरिता पुढील २ ते ३ दिवस अनियमित व अपुऱ्या दाबाने शहरास पाणी पुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा वितरित होणार    सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर पावसाअभावी पाण्याचे संकट आहे. वसईविरारमधील विविध धरणांमध्येही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे.    पाऊस लवकर पडला नाही तर तीव्र पाणीटंचाई शहरात जाणवू शकते, मात्र अशावेळी या नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम झाले तर वसईकरांना अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा वितरित होणार आहे.    त्यामुळे वसई-विरारकरांची पाण्याची तूट भरून निघण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार