शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बविआचेही अवैध कार्यालय पाडा!

By admin | Updated: February 8, 2017 03:59 IST

महापालिकेने सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे अनधिकृत कार्यालय व बांधकामे तोडावीत अन्यथा आगरी सेना एकतर्फी कारवाईविरोधात

वसई : महापालिकेने सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे अनधिकृत कार्यालय व बांधकामे तोडावीत अन्यथा आगरी सेना एकतर्फी कारवाईविरोधात उपोषण करील असा इशारा जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी दिला आहे.शिरगावजवळील कुंभारपाडा येथे अनधिकृत बांधकाम करून आगरी सेनेने कार्यालय सुुरु केले होते. ही चाळ बेकायदा असल्याने महापालिकेच्या पथकाने शनिवारी कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आगरी सेनेच्या एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा इशारा दिला होता. तर तिघांनी गळ्यात दोरी अडकवून गळफास लावून आत्महत्येची धमकी दिली होती. इतकेच नाही तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि दगडफेक केली होती. त्यानंतर महापालिकेने विरार पोलीस ठाण्यात आगरी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता आगरी सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे अनधिकृत कार्यालय आधी तोडा अन्यथा आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना त्रास देत आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. असा इशारा पाटील यांनी दिला आहे.दरम्यान, आगरी सेनेचे कार्यालय अनधिकृत आहे. कुणाच्याही दबावाला बळी न पडता त्यावर कारवाई होणारच. पालिका कायद्यानुसार कारवाई करणार असून अनधिकृत बांधकाम तोडले जाईल, असे उपायुक्त अजीज शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)