शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

ही लढाई आदिवासींच्या अस्मितेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 03:47 IST

जव्हारमध्ये झाली सभा : उद्धव उतरले रस्त्यावर, कल्याण-डहाणू-नाशिक रेल्वे साकारा

जव्हार : पालघर लोकसभा पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजप ने प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेने वनगा स्वर्गीय चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी, शिवसेना पक्ष प्रमुख ऊध्दव ठाकरे प्रचारासाठी, रस्त्यावर ऊतरले आहे. त्यांनी आज मोखाडा, जव्हार, विक्र मगड, वाडा आणि डहाणू तालुक्यातील मतदारांशी संपर्क थेट साधला.ही लढाई, भाजप बरोबर नसून, वनगा कुटुंब आणि आदिवासींच्या अस्मितेची असल्याचे सांगून , उध्दव ठाकरे यांनी आदिवासी मतदारांना शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.भाजपने स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, वनगा कुटुंबाला वाळीत टाकले. मात्र, राजेंद्र गावीत यांना दिड वर्षापासून विधानसभेची उमेदवारी देण्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात जाहीर केले. मात्र, चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, तीन महिने होऊनही, त्यांचे साधे सांत्वन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप ने केले नाही. त्यावेळी वनगांच्या कुटुंबीयांनी, मातोश्री वर येऊन शिवसेनेनेत प्रवेश केला. वनगांना खरी श्रध्दांजली, अर्पण करण्यासाठी श्रीनिवास यांना निवडून द्यावे, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी या दौऱ्यात केले आहे.तसेच दिवंगत चिंतामण वनगा यांनी डहाणू नाशिक रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्ने केले मात्र या भाजप सरकारने त्यांना साथ देण्याऐवजी अनावश्यक असे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, बडोदा हायवे, प्रकल्प सुरू करु न आदिवासीेंची जमीन उकळ्याचे काम चालविले आहे. ते आपल्याला हाणून पडायचे आहे आणि आपण धनुष्यबाणला मतदान करणार मात्र मतदान केल्यावर लाईट धनुष्यबाणचा जळतो की नाही ते पहिले बघा, आणि आता स्लीप सुद्धा निघणार ती ही पहा असे आवाहन त्यांनी केले.भाजप ने स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या कुटुंबाला न्याय देऊ शकले नाहीत, ते काय तुम्हाला न्याय देणार असा सवाल त्यांनी केला. भाजप ची पाया खालची वाळू सरकली आहे. म्हणूनच भाजपने महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ या प्रचारात उतरविले आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018