शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भात खरेदी केंद्राचा ‘आधार’ हरपला?; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:56 IST

तीन महिन्यांपासून भात खरेदीचे पैसेच मिळाले नाहीत

पारोळ : सरकारने थकीत कर्जमाफी व नियमित हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण असतानाच वसई तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत भात खरेदी केंद्रावर तीन महिन्यांपासून भात खरेदीचे पैसे हातात न आल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे. होळी सण साजरा करायला तरी भात खरेदीचे पैसे मिळतील या आशेवर शेतकरी असताना सणाच्या दिवसातही खात्यात पैसे जमा न झाल्याने शेतकºयांचा हिरमोड झाला आहे.

या वर्षी आधारभूत भात खरेदी केंद्रावर क्विंटलमागे दरात व देण्यात येणाºया बोनसमध्ये वाढ झाल्याने या वर्षी ही दरवाढ बळीराजाला दिलासा देणारी होती. मागील वर्षी क्विंटलमागे १७५० व बोनस २०० रुपये असा शासनाचा भाताला हमीभाव होता. पण या वर्षी दरात वाढ होत १८५० व बोनस ७०० असा दर लागू झाल्याने शेतकरी बांधवांसाठी समाधानाची बाब असतानाच आता या वर्षी झालेल्या पीक नुकसानीतही भात खरेदी केंद्रावर चांगला दर मिळाल्याने चांगले हातात पडेल अशी आशा शेतकरी वर्गाला असतानाच काही शेतकºयांनी २४ डिसेंबरला भात खरेदी केंद्रावर भाताची विक्र ी केली होती. पण त्या विक्र ीचे पैसे अजूनही खात्यात जमा न झाल्याने शेतकरी वर्गाला अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही शेतकºयांच्या घरी लग्न आहे, तर काहींच्या मुलांची शालेय फी भरायची आहे. अशी परिस्थिती असताना भात खरेदी केंद्राचे पैसे खात्यात पडत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे.

भात पीक घेणे हे आता शेतकºयांसाठी महागडे ठरत असून बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी, टॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयांना भात पीक घेणे परवडत नाही. काही शेतकरी दागिने गहाण ठेवत तर काही सेवा सोसायटीचे कर्ज घेत भात पिकांची लागवड करतात. पीक लागवडीचा खर्च वजा केला असता त्यांच्या हातात काहीच उरत नाही. जर हा भात व्यापारीवर्गाला विकला तर त्यांचा दर हा विंटलमागे १२०० ते १५०० असा आहे. त्यामुळे व्यापारीवर्ग शेतकरी वर्गाची मोठी पिळवणूक करतात. यामुळे वसईतील शेतकºयांच्या धान विक्रीसाठी राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत वसई तालुक्यात दोन भात केंद्रे सुरू करण्यात आली. त्या अंतर्गत शिरवली, मेढे व भिनार या ठिकाणी डिसेंबर महिन्यापासून भात खरेदी सुरू करण्यात आली. मात्र त्याचे पैसे अद्याप खात्यात जमा झालेले नाहीत.भात खरेदी केलेल्या शेतकºयांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले नसून याबाबतची सर्व कागदपत्रे प्रादेशिक कार्यालय जव्हार येथे सादर करण्यात आली आहेत. पुढील आठवड्यात पैसे शेतकºयांच्या खात्यात जमा होतील. - मोहन इंगळे, अधिकारी आदिवासी विकास महामंडळ