शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाडापोखरण पाणी योजना रखडली, २९ गावांतील ग्रामस्थांचे पाण्याविना हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 03:38 IST

डहाणूच्या साखरे धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही डहाणू, पालघर तालुक्यातील २९ गावांना तसेच खेडयापाडयांना दोन, आठ, तसेच पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याविना लोकांच्या डोळयात पाणी आले

डहाणू : डहाणूच्या साखरे धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही डहाणू, पालघर तालुक्यातील २९ गावांना तसेच खेडयापाडयांना दोन, आठ, तसेच पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याविना लोकांच्या डोळयात पाणी आले असतांनाच बाडापोखरण प्रादेशिक पाणी योजनेच्या नूतनीकरणाचे काम दोन वेळा मुदतवाढ देऊनही पूर्ण होत नसल्याने ही योजना रखडली आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील २६ गावांना तसेच पालघर तालुक्यातील तारापूर, कांबोडे, सावराई अशी एकूण २९ गावांना या योजनेअंतर्गत साखरे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु २००६ ला बाडापोखरण योजनेच्या जलवाहिनी कालबाह्य झाल्याने त्यावेळी शासनाने योजनेच्या नूतनीकरणासाठी ४३ कोटीचे अनुदान मंजुर करून ५ मार्च २०१४ ला योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.या कामात ३२ नवीन जलकुंभाबरोबरच वानगांव ते साखरा पर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे तसेच गावातील वितरण व्यवस्थेची अंतर्गत जलवाहिनी बदलणे इत्यादी कामे संबंधित ठेकेदारांना देण्यात आली होती. परंतु सुरवातीपासूनच हे काम संथ गतीने सुरू असल्याने मुदतीत काम पूर्ण झाले नाही. हे काम जूनला पूर्ण होणार होते. परंतु दहा महिन्याचा कालावधी उलटूनही जलकुंभ, वॉल, ट्रान्सफार्मर, वितरण व्यवस्थेची अंतर्गत जलवाहिनी, मुख्य जलवाहिनी, जलकुंभाचे इनलेट, आऊटलेट, फिनिशिंग इत्यादी बहुसंख्य काम बाकी असल्याने ती केंव्हा पूर्ण होतील असा संतप्त सवाल संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ करीत आहे.दरम्यान जीर्ण व जुनाट झालेल्या जलवाहिन्या वेळीच बदलल्या जात नसल्याने येथील ग्रामस्थांना पंधरा, दिवस महिनाभर पाणी साठवून ठेवून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आली आहे.तर ताणसी, ओसरवाडी तसेच धा. डहाणू या शेवटच्या टोकावर असलेल्या गावांत या योजनेचे पाणीच येत नसल्याने येथील महिला कमालीच्या त्रस्त झाल्या आहेत. दोन वेळा म्हणजेच आठ महिने मुदतवाढ देऊनही बाडापोखरण नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले नाही.डिसेंबर २०१७ पर्यंत या योजनेचे काम पूर्ण होणार असून एक जानेवारी पासून ग्रामस्थांना पुरेशा प्रमाणात व सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.-अरूण निर्भवणेकार्यकारी अभियंताबाडापोखरण पाणी पुरवठा योजना

टॅग्स :Waterपाणी