शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:23 IST

आ. श्रीनिवास वनगा : राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्र म उत्साहात

बोईसर : वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांची सर्वत्र होणारी फसवणूक टाळण्यासाठी जनजागृतीची अत्यंत गरज आहे, असे मत पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केले. अखिल उपभोक्ता सहयोग फाऊंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्र मात बोईसर येथे ते बोलत होते.

तारापूर एमआयडीसीतील टिमा सभागृहात मंगळवारी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक जनजागृती संमेलन पार पडले. या वेळी प्रमुख पाहुणे आमदार वनगा, विशेष अतिथी पालघर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल उपभोक्ता सहयोग फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ पाटील होते. वणगा यांनी सामान्यातील सामान्य माणसापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तसेच भारताचे राष्ट्रपती या मोठ्या व्यक्तीही ग्राहकच आहेत, असे सांगितले. काळे यांनी ग्राहकांची होणारी फसगत टाळावी म्हणून जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा कार्यान्वित होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त करत ग्राहकांनीही अतिशय सावधपणे खरेदी करावी, असे आवाहन केले.

अध्यक्ष दशरथ पाटील यांनी आॅनलाईन आणि वेगवेगळ्या माध्यमातून होणारी ग्राहकांची फसवणूक होत असेल तर त्यांनी फाऊंडेशनकडे तक्रार करावी. संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यात ग्राहकांच्या फसवणुकीबद्दल अनेक ठिकाणी दंड ठोठावण्यात आला आहे, असे सांगून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. या संमेलनात ज्येष्ठ मार्गदर्शक गजानन पाटील यांनी मार्गदर्शन केले. या संमेलनास फूड अ‍ॅण्ड ड्रग्सचे गौरांग जगताप, उत्तराखंडचे अध्यक्ष जोगा सिंग, मुंबईच्या प्रमुख शशिकला पांडे, अखिल उपभोक्ता सहयोग फाऊंडेशनचे राज्य अध्यक्ष नीलेश भोईर, महासचिव संतोष राणे, महाराष्ट्र उपाध्यक्ष मंगेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल पत्रकार प्रमोद पाटील, संतोष पाटील, उद्योजक राजाभाई एडवणकर, व्यावसायिक मुकेश राठोड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार