अनिरुद्ध पाटील / बोर्डीमकरसंक्रांतीला तिळगुळाप्रमाणेच पतंगबाजीला विशेष महत्व आहे. मोकळी मैदानं, घराची गच्ची, समुद्रकिनारी आदि ठिकाणाहून उडविली जाणारी पतंग आणि आकाशात रंगणारा विविध रंग आणि आकारातील पतंगांचा खेळ मनाला आनंद देऊन जातो. मात्र, या खेळात पतंग उडविण्यासाठी लागणाऱ्या मांज्यामुळे आकाशात स्वच्छंदी विहार करणाऱ्या पक्षांना इजा पोहचून नाहक जीव गमवावा लागतो. या काळात जखमी पक्षांची संख्या मागील काही वर्षात कमालीची वाढल्याची माहिती वाईल्डलाइफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेल्फेयर असोसिएशन या डहाणूतील संस्थेने दिली आहे. पर्यावरण तसेच जैवसाखळीत पक्षी महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीने स्वीकारली पाहिजे. शहरी आणि ग्रामीण भागात या बाबत संस्थेच्या माध्यमातून जनजागृती करून ही बाब जनमानसात बिंबविण्याचे काम करीत असल्याची माहिती या संस्थेचे संस्थापक धवल कंसारा यांनी लोकमतला दिली. दरम्यान, या मकरसंक्र ांतीला तिळगूळ वाटून सण साजरा करा पतंगबाजीला आळा घालून पक्षीमित्र बना असे आवाहन करण्यात आले आहे.
पतंगबाजीने होणारे पक्ष्यांचे अपघात टाळा
By admin | Updated: January 14, 2017 06:09 IST