शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निलेश सांबरे यांच्या वाहनावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:24 IST

विक्रमगड येथील कोकण विकास मंच चे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वाहनावर काही अज्ञात इसमानी गोळीबार केला.

पालघर : विक्रमगड येथील कोकण विकास मंच चे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वाहनावर काही अज्ञात इसमानी गोळीबार केला. या प्रकरणी विक्र मगड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी कारवाई बाबत पोलीसा कडून गांभीर्य दाखवले जात नसल्याच्या निषेधार्थ हजारो कार्यर्क्त्यांनी पोलीस स्टेशन ला घेराव घातला.निलेश सांबरे यांनी सामाजिक कार्याबरोबर राजकीय क्षेत्रात पदार्पण करून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यांचा विक्र मगड, वाडा विधानसभा क्षेत्रात मतदारांशी असलेल्या मोठ्या जनसंपर्कामुळे भाजपाला मोठे मतदान होणार असल्याची चिन्हे होती. त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा निर्माण झाला होता.अशा वेळी काही अज्ञात इसमांकडून त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याप्रमाणे २७ मे रोजी रात्री ९ वाजून ७ मी.च्या दरम्यान झडपोली येथील त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर काही अज्ञात गाव गुंडांकडून हैदोस घालण्याचा प्रकार घडला. ह्या प्रकाराची माहिती पोलीस अधीक्षक मंजुनाथ शिंगे व विक्र मगड चे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना तात्काळ सांगून ही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे सांबरे ह्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्ह्या बाहेरून आलेल्या काही गुंडांनी निवडणुकीच्या दिवशी पूर्ण विक्र मगड तालुक्यातील मतदान केंद्रांच्या प्रतिबंधित भागात शिरकाव करून मतदारांना प्रलोभने दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावेळी सांबरे ह्यांचे मेहुणे कल्पेश पडवले यांना दमदाटी करण्यात आली. पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हल्लेखोर आपल्या गाड्यासह पळून गेलेत.