शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यामध्ये कोविडचे नियम पाळून आश्रमशाळा सुरू, वसतिगृहांचे दरवाजे अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 00:38 IST

Palghar : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयाच्या कक्षेत डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यात आश्रमशाळा व वसतिगृहे आहेत.

- हितेन नाईक/अनिरुद्ध पाटीलपालघर/बोर्डी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयांतर्गत ९वी ते १२वीपर्यंतच्या आश्रमशाळा सुरू झाल्या आहेत. कोविडशी संबंधित नियमांचे पालन करून वर्ग सुरू झाले असले, तरी वसतिगृहाचे दरवाजे अद्याप बंदच असल्याची माहिती या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयाच्या कक्षेत डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यात आश्रमशाळा व वसतिगृहे आहेत. त्यानुसार, २७ शासकीय माध्यमिक आणि २१ अनुदानित अशा एकूण ४८ आश्रमशाळा आहेत. शासनाच्या नियमानुसार ९ ते १२ इयत्तांचे वर्ग सुरू करण्याच्या आदेशानुसार शाळांना प्रारंभ झाला आहे.देशासह राज्यभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यातील शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये सर्वच बंद करण्यात आली होती. गेले जवळपास आठ महिने बंद असलेली शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये आता केंद्र आणि राज्य शासनाने कोविडबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरू केली जात आहेत. सध्या ९वी ते १२ वीचे वर्ग सुरू केले आहेत. त्यामध्ये वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन इ.बाबत शिक्षक वर्गाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.या विभागाने प्रत्येक शाळेला थर्मल स्कॅनिंग, ऑक्सिमीटर, तसेच निर्जंतुकीकरण इ.सामुग्री पुरवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अधिकची साधनेही दिली आहेत.

आश्रमशाळांसमोर अडचणी पालघर जिल्हा हा ग्रामीण तसेच आदिवासीबहुल असल्याने जिल्ह्यात सोयी-सुविधांचीही वानवा आहे. त्यामुळे घर ते शाळा हे अंतर विद्यार्थ्यांना पायी कापावे लागते. त्यातच कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे  वसतिगृहे बंद असल्याने विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास होतो. दुपारच्या माध्यान्न भोजनाची व्यवस्था सुरू झालेली नाही, यामुळेही गरीब विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. 

वसतिगृहांसमोरील समस्या पालघर जिल्ह्यामधील वसतिगृहे  अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच शाळेत जावे लागत आहे. मात्र आता ९वी ते १२ वी वर्ग सुुरू झाल्यानंतर वसतिगृह प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्याने लवकरच विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र सध्या तरी ही व्यवस्था होईपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

या विभागाच्या डहाणू कार्यालयांतर्गत डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यातील ९वी ते १२वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. तेथे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते. वसतिगृह अद्याप सुरू झालेली नाहीत.- आशिमा मित्तल, डहाणू प्रकल्प अधिकारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस