शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

‘किखन तेला’साठी प्रसिद्ध आसनगाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2023 14:28 IST

‘किखन तेल’ आणि ‘मितना माच्छी’ समाज ही ओळख बनली आहे.

- अनिरुद्ध पाटील

पालघर जिल्ह्याला सव्वाशे किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून या पट्ट्यात खाडी आणि खाजण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कांदळवन पसरले आहे. कांदळवन वनस्पतींच्या विविध जातींचा समावेश असून, मासेमारी, खेकडापालन, मधुमक्षिका पालन, तसेच अन्य रोजगाराच्या संधी या वनांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळाला आहे.

डहाणू तालुक्यातील वाणगावनजीकच्या आसनगाव आणि परिसरातील ‘मितना माच्छी’ जमातीच्या लोकांना पूर्वजांनी या कांदळवनातील ‘किखन’ या विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीच्या फळांपासून औषधी तेल बनविण्याची कला शिकवली. हे ‘किखन तेल’ खूपच प्रसिद्ध असून आजीबाईच्या बटव्यात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा तुपासारखा दिसणारा पदार्थ दुर्मीळ असून त्याचे औषधी गुणधर्म विविध रोगांवर रामबाण उपाय ठरतात. त्यामुळेच ‘किखन तेल’ आणि ‘मितना माच्छी’ समाज ही ओळख बनली आहे.

डहाणू तालुक्यातील आसनगाव, सावटा, माडगाव मितना माच्छी समाजातील हा महिलाप्रधान व्यवसाय आहे. या ‘किखन’ला मराठीत त्याला ‘काखन’ असे नाव आहे. या वनस्पतीला पिलू, जाल आणि मिसवाक असेही संबोधले जाते. या वनस्पतीचे बॉटनिकल नाव साल्वाडारा परसिका आणि संस्कृतात सार किंवा अर्क म्हणून संबोधले जाते. मूत्रपिंड, तसेच दात व हिरड्यांच्या आजारावर ही वनस्पती गुणकारी असून, विषाणूजन्य आजार, पोटदुखी, सूज, संधिवात यांवर वेदनाक्षम म्हणून वापर होतो.

- किखनाच्या झाडांना हिवाळ्यात फुले येऊन हिरव्या रंगांची बोराच्या आकाराची फळे येतात. - एप्रिल ते मे महिन्यात ही फळे पक्व झाल्यावर त्यांना चेरी फळांसारखा लालसर रंग येतो. त्यांची चव थोडीशी तिखट असते. - पक्व फळे उन्हात सुकवली जातात. योग्य ऊन दिल्यावर या फळांना जात्यामध्ये भरडून डाळ काढली जाते. - ही डाळ तुरीच्या डाळीसारखी दिसते. डाळीला तेलाच्या घाणीत टाकून त्या फळांचे तेल काढले जाते. हे तेल काढण्यासाठी पूर्वी डहाणू गावातल्या तेल घाण्यात जावे लागायचे. - तेल नंतर वातावरणाशी संपर्कात येऊन हळूहळू गोठून पिवळट तुपाप्रमाणे होते. मलमाप्रमाणे दिसत असले तरी त्याला ‘किखन तेल’ असे म्हटले जाते. हे तेल खूपच औषधी गुणधर्मयुक्त असते.

 

टॅग्स :palgharपालघर