शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पालघरात माशांची आवक घटली; क्यार चक्रीवादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:27 IST

भात कापणीसाठी खलाशी आले माघारी

पालघर : जिल्ह्यातील वसई ते झाई-बोर्डी या ११० किमी. च्या किनारपट्टीवरील बहुतांशी बंदरातील मासेमारी दिवाळीमुळे तर क्यार चक्रीवादळाच्या तडाख्याने बंद आहे. त्यामुळे बाजारातील माशांची सर्व स्तरावरून आवक घटल्याने मत्स्यप्रेमींची अडचण झाली आहे.जिल्ह्यातील अर्नाळा, नायगाव, वसई, वडराई, केळवे, नवापूर, उच्छेळी-दांडी, डहाणू आदी मच्छीमारी गावातून मत्स्यप्रेमींना बोंबील, कोळंबी आदी ताज्या मासळीचा पुरवठा केला जातो. तर वसई, नायगाव, अर्नाळा, सातपाटी, मुरबे, डहाणू आदी बंदरातून पापलेट, घोळ, दाढा, सुरमई, हलवा आदी माशांचा मोठा पुरवठा होत असतो. परंतु २५ तारखेपासून दिवाळी असल्याने दोन दिवसांपूर्वीच समुद्रात मासेमारीला गेलेल्या सर्व बोटी बंदरात माघारी आल्या होत्या. तसेच सातपाटी, मुरबे, डहाणू, वसई आदी भागातील बोटीत विक्र मगड, तलासरी, मनोर, जव्हार, डहाणू आदी ग्रामीण भागातील ४ ते ५ हजार आदिवासी बांधव खलाशी कामगार म्हणून काम करतात. ते सर्व दिवाळी सणासाठी आणि आपल्या शेतातील भात कापणीच्या कामासाठी घरी परतले आहेत. दिवाळी संपली असली तरी परतीच्या पावसाने कापणी करून ठेवलेल्या भात पिकाचे नुकसान झाल्याने बोटीतील खलाशी कामगार मासेमारीसाठी बोटीत जाण्यास तयार नाही. तर दुसरीकडे क्यार चक्र ीवादळाच्या तडाख्याने समुद्र घुसळून निघाल्याने माशांचे थवे दडून बसत असल्याने मच्छीमार समुद्रात मासेमारीला जाण्याची जोखीम पत्करायला तयार होत नाहीत. खलाशांचा प्रत्येकी १२ ते १५ हजार महिना पगार, डिझेल, बर्फ, जीवनावश्यक सामग्री आदी सुमारे दीड लाखाचा खर्चही भरून काढणे शक्य होणार नसल्याच्या भीतीने मच्छीमार मासेमारीला जाण्याचे धाडस पत्करण्यास तयार होत नसल्याचे मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजन मेहेर यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या ९ दिवसापासून पूर्णत: मासेमारी ठप्प पडून आहे. अजूनही ढगाळलेले वातावरण आणि मध्येच पाऊस कोसळत असल्याने मासेमारीचे दिवस वाया जात आहेत. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरायचे कसे हा प्रश्नही मच्छीमाराना सतावत आहे.

जिल्ह्यातील मासेमारी गावांव्यतिरिक्त मुंबईच्या छत्रपती मंडई (क्र ॉफर्ड मार्केट) इथे ओखा, पोरबंदर, हावडा (कलकत्ता), रत्नागिरी येथून मोठ्या प्रमाणात मासे मुंबईसह अन्य शहरात विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. परंतु क्यार वादळाचा तडाखा बहुतांशी किनारपट्टीला बसल्याने माशांची आवक घटली आहे. परिणामी खोल खाडीतील बोंबील मासे काही प्रमाणात उपलब्ध होत असून मत्स्यप्रेमींना नाईलाजाने त्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. तर हॉटेल व्यावसायिकांना पापलेट, सुरमई आदी ताजा माशांचा पुरवठा होत नसल्याने शीतगृहात साठवलेल्या माशांवर त्यांना अवलंबून राहावे लागत आहे.४ नोव्हेंबरपर्यंत क्यारचा धोकासमुद्रात घोंघावत असलेल्या क्यार चक्रीवादळाचा धोका हा ४ नोव्हेंबरपर्यंत राहणार असल्याने समुद्रात मासेमारीला गेले असल्यास तत्काळ माघारी येण्याचे पत्र सहा. मत्स्यव्यवसाय आयुक्त, पालघर - ठाणे यांनी दोन्ही जिल्ह्यातील सहकारी संस्थांना पाठवले आहे. त्यामुळे अजून ४ दिवस बोटी समुद्रात जाऊ शकणार नसल्याने मासळीची आवक पूर्णत: बंद पडणार आहे. यामुळे सध्या उपलब्ध माशांचे भावही चढे आहेत. ५० रु पयांना ५ मिळणाऱ्या बोंबील माशाच्या दराने उचल खात १०० रु पयांना ५ बोंबील असा सध्या भाव सुरू आहे.

टॅग्स :Kyarr Cyclonक्यार चक्रीवादळ