शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

संशयित म्हणून पकडले, निघाला ‘सुपारीबाज’, नाशिकमध्ये खुनाची सुपारी, पालघरमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 08:16 IST

Palghar Crime News: नाशिक येथील राहुल पवार याला मारण्याची सुपारी घेणाऱ्या शुभम सिंग (वय २९, रा. लुधियाना) याला पालघरमध्ये जेरबंद करण्यात आले आहे. तुरुंगात असलेल्या दोन आरोपींनी त्याला या हत्येची सुपारी दिलेली होती, असे स्पष्ट झाले असतानाच तो ‘सुपारीबाज’ असल्याचेही पोलिस चौकशीत उघड झाले आहे.

पालघर  - नाशिक येथील राहुल पवार याला मारण्याची सुपारी घेणाऱ्या शुभम सिंग (वय २९, रा. लुधियाना) याला पालघरमध्ये जेरबंद करण्यात आले आहे. तुरुंगात असलेल्या दोन आरोपींनी त्याला या हत्येची सुपारी दिलेली होती, असे स्पष्ट झाले असतानाच तो ‘सुपारीबाज’ असल्याचेही पोलिस चौकशीत उघड झाले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर पोलिसांच्या पथकाने रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतुसांसह शुभमला ताब्यात घेतले.

पालघर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत पराड हे आपले सहकारी उपनिरीक्षक अविनाश वळवी, संकेत पगडे, सहायक फौजदार खंडागळे, हवालदार अशोक तायडे, परमेश्वर मुसळे, सागर राऊत, आकाश आराक, खरपडे, राऊत यांच्यासह गस्त घालत असताना पालघर रेल्वे स्थानकाजवळ एक संशयित व्यक्ती फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावेळी पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, अशी एकूण एक लाख ६६ हजार किमतीची घातक शस्त्रे सापडली. त्याचे नाव शुभम सिंग असे असून तो लुधियानातील व्यक्ती असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. यावेळी नाशिक तुरुंगामध्ये खून आणि दरोड्याच्या प्रकरणातील आरोपी परमिंदर ऊर्फ गौरव राजेंद्र सिंग आणि सातपूर पोलिस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी आशिष राजेंद्र जाधव या दोघांनी राहुल पवार याला ठार मारण्याची सुपारी त्याला दिल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली.

रेकी केली; पण प्रयत्न फसलेशुभम याने अनेक दिवस राहुल पवार यांच्या घराजवळ रेकी करून त्याला ठार मारण्याचे प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी होत नसल्याने त्याने कंटाळून बोईसर येथील आपल्या नातेवाइकांशी संपर्क साधत त्यांच्या घरी येत असल्याचे कळवले. तो शुक्रवारी पालघर रेल्वे स्थानकाजवळ आला असताना पालघर पोलिसांनी त्याला रिव्हाॅल्व्हरसह अटक केली. यावेळी त्याला नेण्यासाठी बोईसर येथून आलेला रिक्षाचालक आणि अन्य एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

टॅग्स :Arrestअटकpalgharपालघर