मनोर : मनोर येथे राहणाऱ्या विवाहीत जिल्हापरिषद शिक्षिकेला तिच्या पतीने बेशुद्ध होईपर्यंत निर्घृण मारहाण व छळ करणारा पती सुदर्शन पाटील याला मनोर पोलीसांनी अटक केली आहे. या पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अटक करण्यात आली नव्हती मात्र पालघर व मुंबई हायकोर्टाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला म्हणून सात महिन्यानंतर पडळ, तालुका पन्हाळा, कोल्हापूर येथे राहणाऱ्या सुदर्शनला पोलीसांनी अटक केलीे. तसेच कोर्टाच्या सांगण्यावरून ३०७ हाफ मर्डरचे कलम लावण्यात आले.पती सुदर्शन पाटील तसेच तिचे सासू-सासरे, नणंद आदींकडून पैशाच्या मागणीसाठी व मूल होत नाही म्हणून तिचा वारंवार छळ केला जात होता. तसेच धमक्याही दिल्या जात होत्या. ११ सप्टेंबर २०१५ रोजी मनोर येथील रईस आर्केड या बिल्डींगच्या सदनिकेत डांबवून तिला बेदम निर्घृण मारहाण करण्यात आली होती.डोक्याला तोंडावर गंभीर दुखापत झाल्याने बेशुद्ध अवस्थेत त्या शिक्षिकेवर आधी ग्रामीण रूग्णालयात व नंतर पालघर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. दि. १३/९/२०१५ रोजी सुदर्शन पाटील (पती), प्रकाश पाटील (सासरे), अमिता थोरात, उत्तमराव थोरात, प्रतिभा पाटील, विद्या पाटील, सहापैकी पाच जणांचा पालघर न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र पती सुदर्शन याचा जामीन फेटाळला होता त्याने पुन्हा मुंबई हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला परंतु २१ मार्च २०१६ रोजी हायकोर्टानेही जामीन फेटाळला व त्याच्या विरुद्धच्या गुन्ह्यात ३०७ कलम लावण्याचा आदेश दिल्यानंतर मनोर पोलीसांना हाफ मर्डरचा एफआयआर दाखल केला आहे.हायकोर्टाने २१ मार्च रोजी आरोपीचा जामीन फेटाळला तरी सुद्धा एक महिना सुदर्शनला पोलिसांनी मोकाट सोडला होता. अखेर त्याला १९ एप्रिलला त्याला अटक केली आहे. (वार्ताहर)
शिक्षिकेला मारहाण करणाऱ्या पतीला अटक
By admin | Updated: April 24, 2016 02:06 IST