शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

खेळाच्या मैदानाच्या जागेवर बांधले चक्क ९ अनधिकृत बंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 00:23 IST

वसई - विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जमीन हडप करून चक्क ९ अनधिकृत बंगले बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नालासोपारा : अनधिकृत बांधकामामुळे गालबोट लागलेल्या वसई - विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जमीन हडप करून चक्क ९ अनधिकृत बंगले बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी विरार पोलीस ठाण्यात गुरुवारी या बंगल्याच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.विरार पूर्वेकडील फुलपाडा रोडवरील मौजे विरार, सर्व्हे नंबर १२८ मधील हिस्सा नंबर १, सर्व्हे नंबर ९३ मधील हिस्सा नंबर ९, १०, ११, १२ ही जमीन शासनाने मैदानासाठी राखीव ठेवली आहे. असे असूनही २७ आॅगस्ट २०१८ पूर्वी ९ अनधिकृत बंगले वसई विरार महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता बिनधास्तपणे शासनाची फसवणूक करून बांधण्यात आले होते. येथे राहणारे प्रकाश पाटील, अजय पाटील, विजय पाटील, उल्हास पाटील, राजेन्द्र पाटील, मितेश पाटील, अरुणा पाटील, अमोल पाटील आणि देवेन्द्र पाटील यांच्याविरोधात ‘सी’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद चव्हाण यांनी गुरुवारी विरार पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला आहे.तालुक्यात सरकारी जमिनीवर कब्जा करून बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे बांधून ग्राहकांना विकली जात आहे. महानगरपालिका या अनधिकृत बांधकामावर कारवाई करत नसल्याने सामान्यांची फसवणूक होत आहे. हे ९ बंगले एकाच दिवशी बांधलेले नाहीत. मग बंगले बांधले त्यावेळी अधिकारी आणि नगररचना विभागातील अधिकारी काय करत होते, असा सवाल नागरिक करत आहेत.>अनधिकृत आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधण्यात येणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे. आतापर्यंत २३ लोकांवर एमआरटीपी, २ बनावट सीसी आणि विरार पोलीस ठाण्यात ११ लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.- प्रमोद चव्हाण (प्रभाग सी, सहाय्यक आयुक्त)>अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई होत असून यापुढेही होत राहील.- बळीराम पवार, आयुक्त,वसई विरार महानगरपालिका