शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जात पंचायत प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी १६ जणांविरोधात केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 21:29 IST

या गावात आजही जात पंचायत अस्तित्वात आहे. जात पंचायतीच्या विरोधात जाणार्‍यांना २५ हजार ते १ लाखांपर्यंतचा दंड आकारला जातो.

नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारच्या चिखलडोंगरी गावातीला मांगेला समाजातील जात पंचायतीच्या १६ व इतर कमिटी सदस्यांच्या विरोधात अर्नाळा पोलिसांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला आहे. विरारच्या चिखलडोंगरी गावात मांगेला समाजाचे लोक राहतात. या गावात आजही जात पंचायत अस्तित्वात आहे. जात पंचायतीच्या विरोधात जाणार्‍यांना २५ हजार ते १ लाखांपर्यंतचा दंड आकारला जातो. मुरबाड तालुक्यातील सासणे येथे असलेल्या दत्ता देवस्थान वारकरी मंडळ ट्रस्ट बरोबर गावातील पंचायतीचा वाद आहे. त्यामुळे चिखलडोंगरी ग्रामस्थांना सासणेला जायला बंदी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगला केवल वैती यांचे विरारमधील चिखल डोंगरी हे त्यांचे मुळगाव असून मुरबाडच्या सासणे येथील निलेश जोशी यांना ते गुरू मानतात व त्यांचेकडे येणे जाणे आहे. मंगला यांचे गुरू निलेश जोशी व गावकरीचे पूर्वीपासून वाद आहेत. त्यामुळे जात पंचायतीने त्यांचेशी कोणीही संबंध ठेवू नये असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या व कुटुंबाचे घरी निलेश जोशी हे येत जात असल्याची माहिती झाली. त्यामुळे गावातील जात पंचायतीने त्यांचे कुटुंबाला ऑक्टोबर २०२१ पासून वाळीत टाकले व त्यांना २५ हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. त्यांनी दंड भरला नाही म्हणून त्यांना गावात येण्यापासून व चिखलडोंगरी गावात रिक्षा स्टॅण्डवर रिक्षा चालवण्यापासून वंचित केले होते. तसेच मंगला यांच्या नातेवाईकांच्या मयताला येऊ दिले नाही. सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गावातील भारत पाटील, प्रकाश मेहेर, किरण मेहेर, मोतीराम वैती या चौघांनी मंगला यांच्या घरी येऊन त्यांना व त्यांच्या पतींना निलेश जोशी यांना गुरू मानणारा गावातील उमेश वैतीला घरी ठेवून घेतल्याचे संशयावरून शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. 

मंगला यांनी मंगळवारी रात्री तक्रार देऊन धनेश मेहेर, धनश्याम तांडेल, कौशल्या केशव राऊत, किरण भास्कर मेहेर, हितेश रामचंद्र मेहेर, भारत नारायण पाटील, राजेश रामचंद्र मेहेर, जगदीश काशिनाथ म्हात्रे, मनीष काशिनाथ म्हात्रे, किशोर नारायण पाटील, ईश्वर बबन वैती, प्रभाकर हरिश्चंद्र मेहेर, विशाल जगन्नाथ वैती, प्रकाश मेहेर, किरण नारायण मेहेर, मोतीराम दामोदर वैती व इतर जात पंचायत कमिटी सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार