शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अर्नाळा ग्रामपंचायतीत घोटाळा

By admin | Updated: June 4, 2017 04:38 IST

अर्नाळा किल्ला ग्रामपंचायीत शौचालये व घरकुले योजनेत घोटाळा झाला आहे. दहा लाभार्थ्यांना शौचालये बांधण्यासाठी निधी देण्यात आला आहे. यातील सहांनी शौचालये बांधलीच

- शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : अर्नाळा किल्ला ग्रामपंचायीत शौचालये व घरकुले योजनेत घोटाळा झाला आहे. दहा लाभार्थ्यांना शौचालये बांधण्यासाठी निधी देण्यात आला आहे. यातील सहांनी शौचालये बांधलीच नाहीत. तर दारिद्रयरेषेखाली असल्याचे दाखवून २१ जणांना घरकुलांचे पैसे वाटल्याचे दाखविण्यात आले असले तरी १६ घरकुले बांधलीच गेलेली नसल्याने लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे उजेडात आले आहे. निर्मल भारत अभियानांतर्गत १६ आॅगस्ट २०१४ रोजी १० लाभार्थींची शौचालये बांधण्यासाठी ४६ हजार रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. पण, त्यांना लाभ दिल्याची ग्रामपंचायतीच्या कॅशबुकमध्ये नोंदच झालेली नाही, असा ठपका चौकशीत ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०१४ रोजी ८७ हजार ४०० रुपये खर्च करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांना ही रक्कम वाटण्यात आल्याची नोंदच कॅशबुकामध्ये करण्यात आलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल ११ लाभार्थ्यांना अनुदान दिल्याचे दाखविण्यात आले असले तरी प्रत्यक्ष एकही शौचालय बांधण्यात आले नसल्याचे चौकशीत उजेडात आले. २२ मार्च २०११ रोजी ८८ हजार रुपये अनुदान दिल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, सदर अनुदान घेतलेल्या लाभार्थ्यांनी शौचालय बांधले नसल्याचेही उजेडात आले आहे. २५ मार्च २०११ ते १९ मे २०११ पर्यंत सरपंच आणि ग्रामसेविकेने लाभार्थ्यांच्या नावाखाली ७९ हजार २०० रुपये खात्यातून काढले होते. प्रत्यक्षात ती लाभार्थ्यांना दिल्याची दप्तरी नोंद नसल्याने त्यांचा अपहार झाल्याचा ठपका निधी चौधरी यांनी आपल्या अहवालात ठेवला आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत १४ लाभार्थ्यांना पैसे देण्यात आले आहेत. त्यापैकी सहा लाभार्थ्यांनी शौचालय बांधलेले नाही तर चार लाभार्थ्यांची शौचालये अपूर्ण आहेत. या लाभार्थ्यांसाठी ग्रामसेविका मधुरा निकम यांनी एकट्याच्या सहीनेच पैसे बँकेतून काढले आहेत. त्यामुळे सरकारी पैशांचा अपहार केल्याचा ठपका ठेवत मु्ख्य कार्यकारी निधी चौधरी यांनी ग्रामसेविका निकम यांना १९ डिसेंबर २०१६ रोजी निलंबित केले.धक्कादायक बाब म्हणजे शौचालय बांधण्यासाठी एकाच कुुटुंबात एकापेक्षा अधिक लोकांना लाभार्थी दाखवून पैसे दिल्याचे दाखवण्यात आले आहे. उपसरपंच विजय मेहेर यांच्या घरात शौचालय नाही. त्यांचा मुलगा सलील विजय मेहेर यांनी लाभार्थी म्हणून अनुदान घेतल्यानंतरही शौचालय बांधलेले नाही. ग्रामपंचायत सदस्या कांता अमृत म्हात्रे त्यांचे पती अमृत पंढरीनाथ म्हात्रे आणि सासरे पंढरीनाथ मगळ््या म्हात्रे यांना शौचालयासाठी अनुदान दिले आहे. त्यामुळे सरपंच भारती वैती, उपसरपंच विजय मेहेर आणि सदस्या कांता म्हात्रे यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९ अन्वये पदावरून दूर करण्याचा अहवाल जिल्हा परिषदेने १६ डिसेंबर २०१६ रोजी कोकण आयुक्तांकडे पाठवला आहे. संतोष जयराम पागधरे, आनंद जयराम पागधरे, महेश जयराम पागधरे या तीन सख्या भावांना शौचालयाचे अनुदान देण़्यात आले आहे. चंद्रकला कौतीक तांडेल, कौतिक यशवंत तांडेल, कौतिक यशवंत तांडेल या पती-पत्नीला शौचालयासाठी अनुदान दिले गेले आहे. वासंती सुनील तांडेल आणि सुनिल भालचंद्र तांडेल या पती-पत्नीला शौचालयासाठी अनुदान दिले गेले आहे. रोहिणी नरेश मेहेर आणि त्यांचा मुलगा जिग्नेश नरेश मेहेर, नितीन जगदीश मेहेर आणि त्यांचा भाऊ यज्ञेश जगदीश मेहेर, आकाश राजेश म्हात्रे यांना दोनवेळा, भरत दत्तात्रेय राऊत आणि त्यांचे भाऊ अनंत राऊत, देवेंद्र रघुनाथ वैती आणि त्यांचा भाऊ रमाकांत रघुनाथ वैती यांना शौचालयासाठी अनुदान दिल्याचे दाखवण्यात आले आहे. यापद्धतीने घरकुल वाटपातही मोठा अपहार झाल्याचे उजेडात आले आहे. दारिद्र्यरेषेखालील २१ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र १६ बनावट लाभार्थी दाखवून पैसे हडपण्यात आल्याचे उजेडात आले आहे. रमाबाई हरी म्हात्रे आणि त्यांचा मुलगा वासुदेव हरी म्हात्रे यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. दिपक भगवान धनू आणि भगवान जैतू धनू यांना घरकुल आणि शौचालयाचा लाभ देण्यात आला आहे. महादेव हरक्या म्हात्रे यांना दोनदा घरकुलाचे आणि एकदा शौचालयाचे अनुदान दिले गेले आहे. महेंद्र भास्कर तांडेल यांना दोनदा घरकुलाचा लाभ दिला गेला आहे. जर्नादन केशव मेहेर, पार्वती देवराम मेहेर, गजानन राघो आरेकर, कैलास प्रभाकर मेहेर, अमर महादेव मेहेर, रमेश कृष्णा धनू यांच्यासह त्यांचा भाऊ देवराज आणि रामराज यांना घरकुल आणि शौचालयाचा लाभ दिला गेला आहे. घोटाळा दडपण्यात अधिकारी यशस्वी?- पंचायत समितीमाच्या बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांनी केलेल्या चौकशीत अनेक घरकुले आणि शौचालये प्रत्यक्षात बांधली गेलेली नाहीत. तर बरीचशी अपूर्णावस्थेत असल्याचा अहवाल दिला होता. मात्र, यात पंचायत समितीमधील एक बडा अधिकारी गुंतलेला असल्याने अहवाल आल्यानंतर चौकशी अधिकारी असलेल्या उप अभियंत्याचीच वसईतून बदली करण्यात आली. त्यामुळे शौचालय घोटाळा चव्हाट्यावर आला असला तरी घरकुल घोटाळा दडपण्यात सध्यातरी पंचायत समितीमधील काही अधिकारी-कर्मचारी यशस्वी झाले आहेत, अशी चर्चा गावात तसेच संपूर्ण तालुक्यात सध्या सुरु आहे.