शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरिफ शेख खुनातील चौघांना कोठडी; पोलिसांनी घेतली न्यायवैज्ञानिक तज्ञांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:31 IST

येथील अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली शेख यांचे शव जाळल्यानंतर उरलेली पुरावे पोलिसांना बिरवाडी येथील एका अर्धवट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये आढळून आले आहे.

पालघर : येथील अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली शेख यांचे शव जाळल्यानंतर उरलेली पुरावे पोलिसांना बिरवाडी येथील एका अर्धवट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये आढळून आले आहे. तसेच या प्रकरणात पालघर पोलिसांनी स्मिता शेट्टी या महिलेलाही अटक केली आहे. आरिफ शेख यांच्या अपहरण व खून प्रकरणी आतापर्यंत स्मिता शेट्टीसह चार आरोपी पोलिसांनी पकडले आहेत. आज मंगळवारी या चारही आरोपींना पालघर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश घाडगे यांनी चारही आरोपींना २२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.व्यावसायिक वादातून आरोपी प्रशांत संखे या मुख्य सूत्रधाराने नामदेव संखे, प्रशांत महाजन यांच्या संगनमताने आरिफ मोहम्मद अली शेख यांना नऊ मे रोजी अपहरण केले होते. त्यानंतर आपल्या वाहनांमध्ये त्यांनी आरिफ यांचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने या आरोपींनी आरिफ याचा मृतदेह बिरवाडी येथे अंगावर ज्वलनशील द्रव टाकून जाळला. त्यानंतर उरलेले पुरावे व त्यांची हाडे या आरोपींनी तिथे असलेल्या एका अर्धवट बांधकाम असलेल्या टाकीत टाकून दिले. हे पुरावे पोलिसांना हाती लागले असून याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत. यासाठी पोलिसांनी न्यायवैज्ञानिक तज्ञांची मदत घेतली आहे ज्या ठिकाणी आरिफ यांना जाळले होते त्या ठिकाणी त्यांच्या सदनिकांची चावीही पोलिसांना आढळून आलेली आहे. आतापर्यंत पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेले स्कॉर्पिओ वाहन व चार आरोपी अटक केली असून विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात आणखी तीन ते चार आरोपी असल्याची शक्यता आहे.आरोपी शिवा ठाकूर याची गळफास लावून आत्महत्याआरिफ शेख याचा खून झाल्यानंतर त्याचा मृतदेह जाळून टाकीत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रमुख भूमिका बजावणाऱ्या शिवा चंद्रकांत ठाकूर (३५) रा. बिरवाडी या आरोपीने बुधवारी शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ंआरिफ शेख या उद्योगपतीच्या अपहरणचा डाव हा नियोजित असल्याचे समोर येत असून या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत संखे यांनी अनेक दिवसांपासून या अपहरण नाट्याची तयारी केली होती.अपहरणासाठी टेम्भोडे येथील चार मुलांना आमिषे दाखवित संखे यांनी त्यांना तयार केल्याची माहिती पोलिसांकडे आल्या नंतर पोलिसांनी या प्रकरणात चार मुलांना ताब्यात घेतले आहे. शेख यांचे अपहरण केल्या नंतर त्याने आपल्या बचावासाठी केलेले जोरदार ओरडून केलेले प्रयत्न आरोपीनी अयशस्वी करीत त्याचे नाक-तोंड दाबून त्याला ठार मारले. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी प्रशांत संखे यांनी बिरवाडी येथील शिवा ठाकूर याची मदत घेतली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी