शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

आर्थिकगणनेसाठी प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:35 IST

सातवी गणना : घरोघरी भेट देणार प्रगणक

पालघर : केंद्र शासनाच्या सांख्यिकी तसेच कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत सातवी आर्थिक गणना २६ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या गणनेसाठी प्रगणकांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व उद्योग व्यवसाय व सेवा यांची प्रत्यक्ष घरोघरी जाऊन कुटुंबाची व उद्योगांना भेटी देऊन गणना करण्यात येणार असून ही माहिती संकलनाच्या ‘सामाजिक सेवा केंद्र’ या संस्थेची नियुक्ती शासनाने केली आहे. माहिती संकलित करणाऱ्या पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून प्रथमत: पूर्णपणे पेपरलेस गणना मोबाईल टॅबचा वापर करून करण्यात येणार आहे. सदर गणनेचे क्षेत्रीय काम योग्यरीत्या पार पाडण्यासाठी प्रगणकांना ओळखपत्र देण्यात आलेले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी सांगितले.पहिली आर्थिक गणना १८७७, दुसरी १९८०, तिसरी १९९०, चौथी १९९७, पाचवी २००५, तर सहावी आर्थिक गणना २०१३ या वर्षी झालेल्या आहेत. या गणनेचा उपयोग प्रामुख्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरिता धोरण तयार करणे तसेच स्थानिक पातळीवर नियोजन करण्याकरिता होणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांनाही माहिती फायदेशीर ठरते. या गणनेमध्ये कुटुंबातील व्यक्ती किती? कुटुंबातील किती सदस्य नोकरी करतात? किती व्यवसाय करतात? घरात उद्योग, व्यवसाय केला जातोय का? या संदर्भात माहिती गोळा केली जाणार आहे. एखाद्या घरी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ भाडेकरू असल्यास त्याबाबतची नोंद केली जाणार आहे. याशिवाय आॅटोरिक्षा, भाजीविक्रेते, फेरीवाले, चायनीज गाड्या यांचीही नोंद केली जाणार आहे. या गणनेमध्ये पिकांचे उत्पादन, वृक्षारोपण, बेकायदेशीर आर्थिक घडामोडी, सार्वजनिक प्रशासन व संरक्षण संस्था, निमलष्करी संस्था आणि बाह्य प्रादेशिक संस्थांच्या आर्थिक घडामोडी इत्यादी बाबी वगळण्यात आल्या आहेत. प्रत्येक स्तरावर माहिती गोपनीय राहणार आहे.माहिती देणे बंधनकारकआर्थिक गणनेचे काम केंद्रातर्फे सांख्यिकी संग्रहण अधिनियम २००८ अन्वये हाती घेण्यात आले असून या अधिनियमानुसार सर्व आस्थापना व कुटुंबांना माहिती देणे बंधनकारक आहे. गणना सुरू असताना प्रत्यक्ष क्षेत्रीय कामांतर्गत कुटुंबाने किंवा आस्थापनाने चुकीची किंवा माहिती देण्यास नकार दिल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर दंडात्मक कार्यवाहीची तरतूद आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी अचूकपणे माहिती देऊन मोहिमेत सहभागी व्हावे. नागरिकांनी माहिती देऊन गणनेचे काम व्यवस्थित होण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर