शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अंजली तेंडुलकरांना कायदेशीररीत्याच कनेक्शन, महावितरणचा अखेर खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:32 AM

अंजली सचिन तेंडुलकर यांच्या मालकीच्या विरार येथील दोन सदनिकांना रितसर अर्ज केल्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच वीज पुरवठा देण्यात आल्याची माहिती महावितरणचे कल्याण विभागाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.

वसई : अंजली सचिन तेंडुलकर यांच्या मालकीच्या विरार येथील दोन सदनिकांना रितसर अर्ज केल्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच वीज पुरवठा देण्यात आल्याची माहिती महावितरणचे कल्याण विभागाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.वीज पुरवठ्यासाठी अर्ज सादर करतांना अंजली तेंडुलकर यांनी त्यांच्या खाजगी मालमत्तेविषयी सादर केलेली कागदपत्रे महावितरणच्या कार्यालयातून मागण्याचा कोणताच अधिकार नगरसेवक धनंजय गावडे यांना नाही. कारण ही बाब सार्वजनिक हिताशी संबंधित नाही. तेंडुलकर यांच्या खाजगी बाबींची माहिती मागणे बेकायदेशीर असून यामुळे एका प्रसिद्ध व्यक्तीच्या खाजगी बाबीत हस्तक्षेप केल्यामुळे त्यांना हकनाक त्रास झाला आहे. असे पवार यांनी म्हटले आहे.महावितरणच्या विरार येथील उपकार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातून जनमाहिती अधिकारी योजना माने यांनी दिलेल्या लेखी माहितीचा खुलासा पवार यांनी केलेला नाही. तेेंडुलकर यांच्या दस्त नोंदणीची कागदपत्रे असिस्टंट इंजिनियर उमेश कदम शोधत असून ती सापडल्यानंतर उपलब्ध करून दिली जातील, असे माने यांनी लिहून दिले आहे. अधिक्षक अभियंता अरुण पापडकर यांनीही ठोस उत्तर दिलेले नाही. खाजगी माहिती देता येत नाही असे पवार म्हणत असले तरी त्यांच्याच वरिष्ठ अधिकाºयांच्या कार्यालयाने दस्तऐवज शोधले जात असल्याचे उत्तर कसे दिले? हा प्रश्न कायम आहे.

टॅग्स :Anjali Tendulkarअंजली तेंडुलकरVasai Virarवसई विरार