शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

तारापूरमधील स्फोटात इंजिनीअरचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 10:06 IST

कारखान्यात दुर्घटना; तीन कामगार जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील जे.पी.एन. फार्मा या कारखान्यात झालेल्या रिॲक्टरच्या स्फोटात प्रयाग घरत (वय २४) या इंजिनीअरचा जागीच मृत्यू झाला. अपघातात  अन्य तीन कामगार जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी याच कारखान्यात झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्र. टी. १०८ व १०९ वरील जे.पी.एन. फार्मा या कारखान्यात सकाळी १० वाजेच्या सुमारास रासायनिक प्रक्रिया सुरू असताना रिॲक्टरमध्ये स्फोट झाला. त्यानंतर रासायनिक प्रक्रियेतून निर्माण झालेल्या वायूची बाधा होऊन प्रयाग घरत याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कामगारांनी तातडीने बाहेर पळ काढला. 

त्यामुळे वेळीच उपचार मिळू शकले नाहीतबेशुद्धावस्थेत पडलेल्या प्रयागला वेळीच उपचार मिळू शकले नाहीत. घटनास्थळी बोईसर पोलिस, अग्निशमन दल आणि औद्योगिक व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पीसीएल-३ या वायूची बाधा झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त त्यांनी केली आहे. प्रयागचे आई- वडील शेती करतात. तो एकुलता एक होता. दोन महिन्यांपूर्वीच तो नोकरीला लागला होता. दुर्घटनेत तिलक राजकुमार बर्मा (वय ४१), युसूफ अयुब मुल्ला (वय ३४) आणि सदानंद लोहार (वय ३९) हे तीन कामगार जखमी झाले आहेत. 

औद्योगिक सुरक्षा विभागाकडून बॉयलर, रिॲक्टर आदी उत्पादित प्रक्रिया करणाऱ्या यंत्रांची नियमित, कठोर तपासणी करणे अपेक्षित असताना अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी आहेत. जे.पी.एन. फार्मा कारखान्यात बल्क ड्रगचे उत्पादन घेतले जाते. येथे ४९ कामगार काम करतात.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार