शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा भेटीबाबत उद्धव ठाकरे यांचे मौन, मात्र स्वबळावर लढण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 06:11 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीबाबत बोलणे टाळले; मात्र ‘साम-दाम-दंड-भेद’वाल्यांना पालघरमध्ये शिवसेनेने घाम फोडला, असा टोला हाणत पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.

तलासरी (जि. पालघर): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीबाबत बोलणे टाळले; मात्र ‘साम-दाम-दंड-भेद’वाल्यांना पालघरमध्ये शिवसेनेने घाम फोडला, असा टोला हाणत पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.पालघरमधील शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी उद्धव ठाकरे येथे आले होते. वनगा कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सभेत उद्धव यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्ला चढवला. पालघरमध्ये नैतिक विजय आपलाच झालेला आहे. आता येथून आपला खासदार निवडून आल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचे नाही. आता जे काही चालले आहे, ती सगळी नाटके आहेत. खरा पिक्चर पुढे आहे आणि त्या पिक्चरचा हिरो तूच आहेस, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी पालघरमधून श्रीनिवास वनगा हेच शिवसेनेचे उमेदवार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. श्रीनिवास वनगा यांच्याकडे पालघर मतदारसंघाच्या संघटकपदाची जबाबदारी सोपवत असल्याची घोषणाही उद्धव यांनी केली.स्वबळावर राऊत ठाम!अमित शहा यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी मौन बाळगले असले, तरी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र युती होणार नसल्याचे संकेत दिले. ते म्हणाले, आम्हाला माहीत आहे की, अमित शहा यांचा अजेंडा काय आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यात आता कोणताही बदल शक्य नाही.आयोगावर टीकानिवडणूक आयोगावरही उद्धव यांनी टीकास्त्र सोडले. निवडणुकीत पैसे वाटप करणाऱ्यांना शिवसैनिकांनी रंगेहाथ पकडून दिलेले असताना त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. हेच शिवसैनिकांबाबत घडले असते तर? हीच लोकशाही आहे का, असा सवालही ठाकरे यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे