शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

प्रचाराचा सारा ट्रेंडच बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 02:02 IST

साधने आणि मार्ग बदललेत : सोशल मीडियाला आले महत्व

विक्रमगड : ग्रामीण भागात निवडणुकीचा प्रचार म्हटला की तरुण कार्यकर्ते हातात उमेदवाराचे फोटो, जाहिरनामे घेऊन आणि रीक्षेला भोंगा लाऊंन त्या गगणभेदी घोषणा देत फिरायचे पण या आधुनिक काळात हे सर्व बदलले आहे. प्रचार ही हायटेक झाला आहे. सोशल मिडिया चा वापर वाढला आहे. पालघर लोकसभा निवडणूक प्रचाराने वेग घेतला आहे.सर्वत्र रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आता प्रचार यंत्रणा ‘हायटेक’ होऊनही ‘डोअर टू डोअर’ मतदारांच्या भेटीवर सर्वाधिक भर दिला जात आहे. पूर्वीच्या गगनभेदी घोषणा आता लुप्त झाल्या असून भोंग्यांचा कर्कश आवाज, गाणी, घोषणा यांची जागा घेत सोशल मीडिया. इतर निवडणुकांच्या तुलनेत लोकसभा कार्यक्षेत्र आकारमानाने मोठे असल्याने प्रचार करणारे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. ‘हायटेक’ प्रचार यंत्रणेत इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप या माध्यमातून पारंपरिक प्रचार यंत्रणेला ‘खो’ दिला गेला आहे. आणि त्याची जागा तात्काळ व जलद गतीच्या ‘इलेक्ट्रॉनिक’ यंत्रणांनी जागा घेतली; पण सर्व उमेदवारांचा भर ‘डोअर टू डोअर’ जाण्यावर अधिक भर आहे. प्रचाराला कमी दिवसांचा अवधी मिळत असल्याने पूर्वीसारखी दिर्घ रंगत आता पाहायला मिळत नाही. होर्डींग, फ्लेक्स, कटआऊटने जागा व्यापून आपल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचिवण्याचा प्रयत्न केला जात असून पूर्वी उमेदवारांच्या विश्वासू, निष्ठावान कार्यकर्त्यांची एक फळीच असायची. ते निष्ठेने कार्य करायचे. त्यासाठी ते पदरचा खर्च करायचे. आता मात्र भाडोत्री कार्यकर्त्यांचा जमाना आहे. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या भोजनापर्यंत सगळा खर्च करून शिवाय ४०० ते ५०० रुपये रोज त्यांना दिले जातात. सगळेच पक्ष हा प्रकार करीत असल्याने एकच कार्य करतात. सकाळी एका पक्षाचा तर दुपारी दुसऱ्या पक्षाचा असल्याचे पहायला मिळते.यामुळे अशा भाडोत्रींची मात्र सध्या चांगलीच चंगळ होत आहे.सोशल मीडिया हे तरु ण मतदारा पर्यन्त पोहचण्याचे प्रभावी माध्यम आहे. पालघर जिल्हातील ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात मतदार सोशल मिडियाचा वापर करतात त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत हायटेक प्रचार आणि सोशल मीडिया द्वारे केलेला प्रचार मतदाराणा आकर्षित करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.- नीलेश सांबरे, अध्यक्ष,कोंकण विकास मंचया निवडणुकीच्या प्रचारात ग्रामीण व शहरी भागाचा विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही या निवडणुकीचा प्रचार करत आहोत. कमी वेळात जास्तीत जास्त मतदारान पर्यंत पोहचण्याचे प्रभावी माध्यम सोशल मीडिया ठरत आहे. त्यामुळे सोशल मिडीयाद्वारे केलेला प्रचार आमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.- सुशील औसरकर, अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, पालघर

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Electionनिवडणूक