शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

सर्वच राजकीय पक्षांना पुढील आठवडा ठरणार धावपळीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:54 IST

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले असून निवणुकीच्या हालचालींना वेग आला आहे़

विक्रमगड: मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले असून निवणुकीच्या हालचालींना वेग आला आहे़ मात्र, पालघर लोकसभेसाठी शिवसेना-भाजप आणि बविआ असा चुरसीचा सामना बघावयास मिळणार आहे़ बविआला सहा लाख मतांची बेगमी करावी लागणार आहे.पोटनिवडकीच्या मतांच्या आकडेवारी वरुन भाजपा-शिवसेना युतीकडे त्यांच्या एकत्रित मतांची बेरीज केली तर ५ लाख १५ हजार ९९२ मते होतात. तर बविआकडे स्वत:ची २ लाख २२ हजार मते व माकपाची ७१ हजार ८८७ मते अशा एकुण २ लाख ९४ हजार ७२५ मतांची बविआकडे जुळवणूक झाली आहे़ त्यात कॉगे्रसची ४७ हजार ७१४ मते जमा बेरीज ३ लाख ४२ हजार ४३९ पर्यतच पोहचते उर्वरीत १ लाख ७३ हजार ५५३ मतांचा फरक तोडण्यासाठी बविआला युतीची मते आपल्याकडे खेण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.मतदारसंघात शहरी व ग्रामीण अशी मत विभागणी होण्याची चिन्हे आहेत़ यामध्ये प्रामुख्याने महायुती, बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये खरी लढत अपेक्षित आहे़ परंतु उमेदवारांनी मतदारांवर कितीही प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला तरी मतांची विभागणी व स्थानिक राजकारण यावरच उमेदवारांचा टिकाव लागणार आहे़ अधिकृतरित्या जाहिर झालेले उमेदवारांची आपला प्रचार सुरु केला असून सभा, रॅली, मतदारांच्या घरोघरी जावून प्रचार सुरु झाला आहे. पूर्वी लोक प्रतिनिधी म्हणून मतदारांनी ज्याच्यावर विश्वास टाकलेला आहे़ त्यांच्या स्थानिक विकास कामाच्या जोरावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहाणार आहे़ २९ एप्रिलला निवडणूक होणार असल्याने रविवार पासून फक्त आठ दिवसांत प्रचारासाठी हातामध्ये उरले आहेत. या आठ दिवसांत आठ तालुके पिंजून काढावे लागणार आहे़ त्यामुळे पुढील आठवडा महत्वाचा ठरणार आहे.>२०१८ च्या पोटनिवडणुकीची स्थिती२०१८ ची पोटनिवडणुक बहुजन विकास आघाडीने त्यावेळेस फारशी गांभीर्याने न घेतल्याने हक्कांची मते शिवसेना व भाजपामध्ये विभागली गेली होती. तसेच, यामध्ये कॉगे्रस तर खुपच दुर होते व राष्टÑवादीची मते देखील शिवसेना व भाजपात विभागली गेली. तसेच राजेंद्र गावितांच्या उमेदवारीने देखील भाजपाला फायदा झाला़ तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जावुन इतर पक्षांच्या मतदारांना आपल्याकडे वळविल्यामुळे देखील आणि एकंदरीत ही पोटनिवडणुक प्रतिश्ठेची झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लक्ष घातल्याने भाजपाला ही बाजी मारता आली होती़माकप, राष्ट्रवादी, कॉग्रेस व बहुजन विकास आघाडी हे एकत्र लढत देत असल्याने पालघर लोकसभा मतदार संघातील डहाणु, तलासरी, जव्हार व विक्रमगड तालुक्यातील काही भागात माकपाचा प्रभाव आहे़ तर काही भाग त्यांचे बालेकिल्ले म्हणुन देखील ओळखले जातात़ आठ महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत बविआ व माकप आणि राष्टÑवीदी-कॉग्रेस हे वेगळे लढल्याने बविआ तिसऱ्या तर माकप चौथ्या आणि कॉगे्रस पाचव्या क्रमांकवर होते़ यावेळी त्यांची निशाणी हायजॅक झाल्याने त्यांच्यापुढे नवे संकट असणार आहे.>विक्रमगड विधानसभेतील मतदार करणार नोटा बटनाचा वापरविक्रमगड विधानसभा मतदारसंघातील आदिवासी दºया,खाऱ्यांत राहुन अनेक सुविधाविना पाणी, रोजगार, शिक्षण, दळण-वळण, रस्ते आदी समस्या घेवुन आपले जिवन जगत आलेला आहे़ निवडणुकांत आश्वासना व्यतिरिक्त त्यांना काही मिळत नाही. ़त्यामुळे येथील मतदार नोटाचा वापर करण्याची भुमीका घेणार असल्याचे मतदार बोलत आहेत. तर विक्रमगड तालुक्यातील म्हसरोली व अन्य काही गावपाडयातील मतदारांकडुन मतदान करण्यासाठी नाराजीर सुर निघत आहेत. तालुक्यातील अनेक लोक रोजगारासाठी आपल्या कुंटुंबासह इतर षहरांच्या ठिकाणी स्थलांतरी झाल्याने त्यांचाही परिणाम मतदानावर होईल.>पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतउमेदवारांना मिळालेली मतेउमेदवार पक्ष मिळालेली मते1) राजेंद्र गावित भाजपा २७२७८२2) श्रीनिवास वनगा शिवसेना २४३२१०3) बळीराम जाधव बविआ २२२८३८4) किरण गहला माकप ७१८८७5) दामोदर शिगडा कॉग्रेस ४७७१४6) संदिप जाधव अपक्ष ६६७०7) शंकर बदादे अपक्ष ४८८४8) नोटा ---- १६६४४

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर