शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सर्व पक्षांना बंडखोरीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:42 IST

पालघरचे राजकीय समीकरण बिघडले : निष्ठावंत, बंडखोर अपक्ष लढण्याच्या तयारीत

पालघर : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याचा सपाटा सुरु झाल्याने २८ नगरसेवकांच्या जागांचे गणित बिघडणार आहे. याचा निष्ठावंत शिवसैनिकात संतप्त असून अनेकांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार अर्ज भरण्याची तयारी चालवली आहे. त्यातच युती झाल्यास जागा वाटपाचे गणितही कोलमडण्याच्या उंबरठ्यावर उभे राहणार असल्याने भाजपकडून २८ उमेदवार तयारीत आहेत.

राष्ट्रवादीतून हकालपट्टी केलेले गटनेते, नगरसेवक मकरंद पाटील, त्यांच्या पत्नी नगरसेविका डॉ. श्वेता पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका बिंदीया दीक्षित, रेश्मा म्हात्रे, प्रविण मोरे हे पाच नगरसेवक गुरु वारी रात्रौ सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असून शिवसेने कडून नगराध्यक्षाची उमेदवार म्हणून डॉ. श्वेता पाटील यांच्या नावाची घोषणा आणि त्या अन्य नगरसेवकांना सेनेकडून पुन्हा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

या बातमी मुळे स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्या मध्ये संतप्त भाव उमटत असून राष्ट्रवादीच्या ५ विद्यमान नगरसेवकासह राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, शहर प्रमुख अस्लम मणियार, माजी नगरसेवक रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे, राजू पाटील, अमोल पाटील या पाच पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेताना त्यांना नगरसेवक पदाचे तिकीट देण्याच्या अटीवरच घेतले गेले असल्याने निष्ठावान शिवसैनिक आणि उपरे असा वाद निर्माण होणार आहे.विद्यमान नगरपरिषदेत २८ पैकी १७ नगरसेवक शिवसेनेचे असून हे सर्व निष्ठावंत आहेत. त्यांनी पुन्हा पक्षाकडे उमेदवारी मागितली असून अन्य पक्षातून आयात केलेल्या १० लोकांना कसे सामावून घेणार हा पेच आहे. त्यातच युती झाल्यास भाजप ने निम्म्या जागांवर आपला अधिकारमागितला असल्याने, मित्रपक्ष आरपीआयला एक-दोन जागा सोडणे गरजेचे असल्याने २८ जागांच्या उमेदवारीचे वाटप कसे करणार असा हा प्रश्न आहे.शिवसेनेचे नगरसेवक गुरुवारी मातोश्रीवर गेल्याने दबावतंत्रमकरंद पाटील आणि डॉ. श्वेता पाटील सह अन्य नगरसेवकांना सेनेत घेण्यास स्थानिक शिवसैनिक, पदाधिकाºयाचा प्रचंड मोठा विरोध आहे. मकरंद पाटील आणि त्यांच्यासह अन्य बाहेरच्या पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घ्यायची गरजच काय? असा प्रश्न शिवसैनिका मधून उपस्थित केला जात आहे. माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, अंजली पाटील, उच्च शक्षिति प्राजक्ता वर्दे असे निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार सेने कडे असताना बाहेरच्या पक्षातील लोक पक्षात घेण्याची आवश्यकताच काय? असा प्रश्न घेऊन शिवसेनेचे काही नगरसेवक, पदाधिकारी गुरु वारी मातोश्रीवर गेल्याचे समजते. अश्या परिस्थितीत सेनेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असून सेनेला बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अंतर्गत कलह निर्माण होताना दिसत आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाpalgharपालघर