शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धामणीचे सर्व दरवाजे उघडले, उन्हाळी सिंचनाचीही झाली सोय, बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:52 IST

सूर्या प्रकल्पांतर्गत असलेले धामणी धरण ओसंडून वाहू लागले असून धरणाच्या पाच गेट मधून ४ हजार २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदी द्वारे करण्यात येत असून धरण क्षेत्रात पडणा-या पावसामुळे तो अधिक होण्याची शक्यता अधीक्षक अभियंता निलेश दुसाने यांनी व्यक्त केली आहे.

पालघर/कासा : सूर्या प्रकल्पांतर्गत असलेले धामणी धरण ओसंडून वाहू लागले असून धरणाच्या पाच गेट मधून ४ हजार २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदी द्वारे करण्यात येत असून धरण क्षेत्रात पडणा-या पावसामुळे तो अधिक होण्याची शक्यता अधीक्षक अभियंता निलेश दुसाने यांनी व्यक्त केली आहे.पालघर जिल्ह्यात सर्वच भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून सकाळ पासून पावसाची रीपरिप सुरुच आहे. त्यामुळे पालघर, डहाणू तालुक्यासह विक्रमगड तालुक्यातील काही भागांना पाणीपुरवठा करणारे हे धरण आज पूर्ण भरले. या धरणाची क्षमता २८६ द.ल.घ.मी असून १ जून पासून ह्या धरण क्षेत्रात ३ हजार २४४ मिमी पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी ही ह्याच कालावधीत हे धरण भरले होते.पालघर तालुक्यातील २६ गावे नळ पाणीपुरवठा योजना, बोईसर एमआयडीसी, टी ए पी एस कॉलनी, डहाणू तील बाडापोखरण, थर्मल पॉवर, वसई-विरार, भार्इंदर या शहराला धामणी धरणातून सूर्या नदीद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे या शहरांचा पाण्याचा व शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.आज या धरणाचे ३ दरवाजे १ फुटाने तर २ दरवाजे अर्ध्या फूटाने उघडण्यात आले आहेत. गरज भासल्यास ते अधिक उंचीने उघडले जातील. अशी माहिती त्यांनी दिली.सध्या ४२०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात येत असून सध्याची पावसाची रिपरिप सुरु च राहिली तर पाण्याचा विसर्ग अधिक वाढविला जाऊ शकतो. असेही त्यांनी सांगितले. कवडास धरणही ओसंडून वहात असून त्या धरणाचे सूर्या नदीत सोडण्यात आले आहे. या नदीवर नवा उंच पूल बांधण्यात आल्याने यंदा प्रतिवर्षीप्रमाणे असा विसर्ग होताच मासवण पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद पडण्याची पाळी आता येणार नाही. कारण पूर्वीचा ठेंगणा पूल पाण्याखाली गेला तरी नव्या पूलावरून वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे.

टॅग्स :Damधरण