शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सर्वच एटीएम मंगळवारपर्यंत राहणार बंद?

By admin | Updated: November 11, 2016 02:51 IST

जोपर्यंत नव्या आणि चलनात असलेल्या नोटांचा मुबलक पुरवठा होत नाही तोपर्यंत सर्वच बँकांची एटीएम बंद राहणार आहेत

पालघर/नंडोरे : जोपर्यंत नव्या आणि चलनात असलेल्या नोटांचा मुबलक पुरवठा होत नाही तोपर्यंत सर्वच बँकांची एटीएम बंद राहणार आहेत. हा कालावधी मंगळवारपर्यंतचा असू शकतो अशी आॅफ दे रेकॉर्ड माहिती बँकांतूनच मिळू लागल्याने सर्वसामान्य हादरून गेले होते.५०० व १०० रु पयांच्या नोटा चलनातून अचानक बंद करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे व पहिल्या दिवशी बँकांसह ए टी एम बंद असल्याने तसेच कोणीही या नोटा स्वीकारत नसल्यामुळे पालघरमध्ये आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. दुसऱ््या दिवशी बँका सुरु होतील तेव्हा हाती पैसे येऊन जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करता येईल या आहेत असलेल्या सर्वसामान्य माणसाची आज दुसऱ्या दिवशीही प्रचंड कोंडी झाली. बँकांमधून पैसे मिळविण्यासाठी तासंतास झालेली रखडपट्टी हा कामगार,मध्यमवर्गीय या साऱ्यांसाठी कष्टप्रद अनुभव राहिला पण रोज मजुरी करून आपलं पोट भरणाऱ्या मजुरांच्या कुटुंबासाठी मात्र आजचा दिवस उपासमारीचा ठरला. पैसे आहेत पण ते कुणी स्वीकरत नाहीत. यामुळे उधारी किंवा उपासमार हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे होते. या निर्णयाचा मोठा फटका सर्वसामान्याला बसला असल्याचे यावरून दिसते आहे. काळा पैसा म्हणजे काय याची कल्पनाही नसलेल्या व कधीही काळा पैसा न बाळगणारा प्रामाणिक यात भरडून निघाला.५०० व १००० रु पयांच्या या नोटा बँकेशिवाय कोणीही स्वीकारत नसल्यामुळे आज दुसर्या दिवशीही बाजारपेठा ,भाजी बाजार ,सराफ बाजार थंडावला होता याउलट या नोटा बँकेत जमा करण्यासाठी व बँकेतून पैसे काढण्यासाठी कधीही दिसले नाही अशी अलोट गर्दी बँकांसमोर आज दिसली. या गर्दीला तोंड देता देता बँकाची भंबेरीच उडाल्याचे चित्र दिसले. पैसे काढण्यापेक्षा पैसे जमा करण्यासाठी लोक आज घाई करत होते. एरवी कधीही वेटिंगवर न राहणारेसुद्धा आज पैसे बदलून घेण्यासाठी तासंतास रांगेत उभे होते. आज बँकांकडून कमी का असेना फक्त 1000 रु पयांच्याच नोटा ग्राहकांना मिळत होत्या त्यामुळे रोजचा व्यवहार तरी सुकर होईल अशा भावना ग्राहकांनी व्यक्त केल्या.पोस्ट आॅफिस बरोबरीने पालघरमधील अर्ध्या डझनहून अधिक बँका आज हाऊसफुल्ल झाल्या होत्या.कधीही नसेल तसा आज बँकांमध्ये ५०० व १००० रु पयांच्या नोटांचा खच पाहावयास मिळाला . बँका संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याने बँक कर्मचाऱ्यांंचीही दमछाक झाली .नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून या पुढे मिहनाभर बँका संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघड्या राहणार आहेत. बँका चालू असल्या तरी एक दोन दिवस पैसे येईपर्यंत ए टी एम मात्र बंद राहणार असल्याचे कळते आहे. (वार्ताहर)