शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा आचारसंहिता लागू, विकासकामे रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:51 IST

जव्हार नगर परिषदेचे कामकाज मागील काही वर्षापासून काही ना काही कारणास्तव बंद पडलेले असून, नुकतीच पालघर लोकसभा पोटनिवडणूकीची आचारसंहिता संपत नाही

हुसेन मेमन जव्हार : जव्हार नगर परिषदेचे कामकाज मागील काही वर्षापासून काही ना काही कारणास्तव बंद पडलेले असून, नुकतीच पालघर लोकसभा पोटनिवडणूकीची आचारसंहिता संपत नाही तोच कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पुन्हा अनेक विकास कामांची मंजुरी आचारसंहितेमुळे लटकलेली असून अनेक कामांच्या मंजुरी व विकास लांबणीवर पडणार आहे.मागील काही वर्षापासून नगर परिषदेत नगरसेवकांची गटबाजी व बंडखोरी झाली, त्यात ५ नगरसेवकांचे पद रद्द झाल्यामुळे मागील वर्षी नगर परिषदेची पोटनिवडणूक झाली, त्यानंतर मध्यंतरीच्या काळात नगर परिषदेची सार्वत्रीक निवडणूक यामुळे सर्वसाधारण सभा होणे अशक्य होते, यात सार्वत्रिक निवडणूकीनंतर नविन बॉडीच्या फक्त दोन ते तीनच सर्वसाधारण सभा घेण्यात आल्या, त्यात शकडो कामांचे विषय व ठराव झाले. परंतु पुन्हा पालघर लोकसभेचे खासदार चिंतामण वणगा यांच्या मृत्यू नंतर नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीची आचारसंहिता संपण्या आगोदरच पुन्हा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका जाहिर झाल्यामुळे पुन्हा जून महिना आचार संहितेमध्ये जाणार आहे.दरम्यान नगर परिषदेचे दिवंगत नगरसेवक अमोल औसरकर यांचा दिर्घ आजाराने मृत्यू झाला आहे, त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली असून, या जागेकरीता जुलै ते सप्टेंबरच्या काळात पोटनिवडणूक लागणाची शक्यता आहे, त्यामुळे नगर परिषदेला माहे एप्रिल पासून तर सप्टेंबर पर्यत कुठलाच निर्णय घेता येणार नसल्याचे चित्र समोर येत आहे. जव्हारच्या विकासाला जणू गेल्या काही वर्षापासून साडे साती लागलेली आहे.त्यात प्रशासनाच्या ढिम्म कामगीरीमुळे मागील सत्तेच्या काळात म्हणजेच मागील दोन वर्षापूर्वी मिळालेल्या मंजुरीची कामे आजही अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका नागरीकांना बसत आहे, यात प्रामुख्याने शहरातील मुख्य रस्ते व गल्ली बोळांचे डांबरीकरण करणे, गटारे बांधणे आदी कामांचा समावेश आहे. ज्याकामांचे आदेश पारीत झालेले आहेत, अशा कामांना कालावधी दिलेला असतो, मात्र त्याचे पालन कुठेही होताना दिसत नाही.