शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

म्हसेपाड्यातील बालिकेच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग; बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 08:36 IST

दोन नद्यांमुळे तुटतो गावाचा संपर्क

विक्रमगड : तालुक्यातील मलवाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील म्हसेपाडा  येथील केवळ ४२ दिवसांच्या बालिकेचा रस्त्याअभावी तसेच वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ११) पहाटे घडल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी विक्रमगड तहसील कार्यालयामध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक होऊन बंधाऱ्याचे काम तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र पावसाळा असल्यामुळे हे काम लगेचच कसे पूर्ण होणार, याबाबत ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

वाडा व विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवर तसेच गारगाई व पिंजाळ नदीच्या बेटावर म्हसेपाडा हे गाव वसले आहे. सध्या या म्हसेपाडा गावाची अवस्था अतिशय दयनीय असते. पावसाळ्यातील चार महिने या गावाचा इतर भागाशी संपर्क तुटलेला असतो.  दोन नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने धोकादायक अवस्थेत पोहून किंवा बंधाऱ्यावर फळी टाकून त्यावरून लोकांना ये-जा करावी लागते. याची पूर्वकल्पना असतानाही प्रशासनाने आजवर दुर्लक्ष केलेले आहे.

अशा दिल्या सूचनालावण्या नरेश चव्हाण (४२ दिवस) या बालिकेच्या मृत्यूच्या घटनेनंतर बुधवारी विक्रमगड तहसील कार्यालयामध्ये प्रशासकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक, लघुपाटबंधारे अधिकारी व म्हसेपाडा गावातील ग्रामस्थ यांची बैठक पार पडली. यावेळी अपूर्ण असलेला बंधारा व बंधाऱ्यावर स्लॅबचे काम तातडीने करण्याचे आदेश तहसीलदार चारुशीला पवार यांनी लघुपाटबंधारे विभागाला दिले आहेत. आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवून या विभागामध्ये प्राथमिक उपचारासाठी थोड्या प्रमाणात त्या पाड्यात मेडिकल उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. अतिदक्षता म्हणून पूरस्थिती असताना विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी या तीरावरून त्या तीरावर न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

रस्त्यासाठी करणार पाठपुरावागारगाव येथे रस्ता मंजूर होणार आहे, त्याचा पाठपुरावाही केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. काही प्रमुख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचे संपर्क नंबर त्या गावात लावण्याचे आदेशही ग्रामपंचायतीला दिले आहेत. विक्रमगड तालुक्यामध्ये काही रस्ते झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली, तरी उर्वरित जे रस्ते अनकनेक्टेड आहेत, त्याबाबत प्रकल्प कार्यालय, बांधकाम विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.