शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१६ दिवसांनी वयोवृद्ध पेट्रोल पंपांच्या मालकाच्या हत्येचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2024 17:32 IST

पोलिसांनी रोख रक्कम, हिऱ्याची अंगठी व महागडे घड्याळ असा १५ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- अपहरण केलेल्या ७५ वर्षीय वयोवृद्ध पेट्रोल पंप चालकाच्या हत्येचा उलगडा करण्यात १६ दिवसांनी युनिट दोन आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. पोलिसांनी रोख रक्कम, हिऱ्याची अंगठी व महागडे घड्याळ असा १५ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

उल्हासनगरच्या आर्केट बिल्डिंगमध्ये राहणारे पेट्रोल पंपमालक रामचंद्र काकराणी (७५) यांची त्यांच्या कारमध्ये रूमालाने गळा आवळून हत्या केलेला मृतदेह २५ ऑगस्टला दुपारी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथे सापडला होता. जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने अपहरण करून हत्या केल्याच्या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार युनिट दोन आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेने वेगवेगळी पथके तयार केली. रामचंद्र काकराणी यांचा कार चालक मुकेश खूबचंदाणी (५८) याचेसह साथीदार रामलाल यादव (२२) व अनिल राजकुमार उर्फ नेपाल उर्फ सहानी उर्फ थापा (३२) यांनी ही हत्या केली आहे. हे तिघे मागील सात महिन्यापासून हत्येचे प्लॅनिंग करत होते. १० लाखांची अंगठी व ५ लाखांचे घड्याळ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर गोरखपूर येथे सापळा रचून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपी मुकेश आणि अनिल उर्फ थापा यांना अटक केली आहे. तर फरार आरोपी रामलाल यादवचा शोध घेत आहेत. आरोपी चालक मुकेश खूबचंदाणी याच्यावर मुंबईत याआधी ६ गुन्हे दाखल आहेत.

तिन्ही आरोपी वसई फाट्यावरून विरार फाट्यापर्यंत रिक्षाने, विरार फाट्यावरून तलासरीपर्यंत मेटा ट्रॅव्हल्सने पळाले. तेथून पायी गुजरात बार्डर क्रॉस केली व नंतर बसने अहमदाबाद - दाऊद - इंदोर - झासी - कानपूर - नेपाळ बॉर्डर पर्यंत पळाले होते. वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, मध्यवर्ती शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, नितीन बेंद्रे यांच्यासह पथकाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी