शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वसई किल्ल्यात प्रवेश शुल्क, अवैध प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय; आधुनिक प्रशासनगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:45 IST

वसई : सुप्रसिद्ध वसई किल्ल््यात सुरु असलेले अवैध प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने खंबीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

शशी करपेवसई : सुप्रसिद्ध वसई किल्ल््यात सुरु असलेले अवैध प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने खंबीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. किल्ल्यात प्रवेश शुल्क आकारण्यासोबतच ठराविक वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव येत्या काही महिन्यांतच संमत होणार आहे.पोर्तुगिजांची हुकुमत उलथवून मराठ्यांनी वसई किल्ला काबिज केला होता. राज्यातील प्रमुख किल्ल्यांमध्ये वसई किल्ल्याचा पाचवा क्रमांक लागतो. १०९ एकरात पसरलेल्या किल्ल्याचे पावित्र्य सध्या सुरू असलेल्या अवैध प्रकारांनी राखले जात नाही तसेच व्यावसायिक फोटोग्राफीसाठी किल्ल्याचा वापर केला जात आहे, अशी तक्रार दुर्गप्रेमींनी केली होती. तिची दखल घेऊन पुरातत्व विभागाने किल्ल्यात निर्बंंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. वसई किल्ल्यात प्रवेश शुल्क आकारणे आणि सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेतच प्रवेश देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याला लवकरच मंजूरी मिळेल, अशी माहिती पुरातत्व विभागाचे अधिक्षक बिपीनचंद्र नेगी यांनी दिली.प्राचीन वास्तू या विविध संस्कृतींचा वारसा असते. मानवजातीने बनवलेली ही कला आहे. धर्मजातीपलिकडचा हा ठेवा आहे. त्यांचे संरक्षण करणे सामाजिक कार्य आहे. पण, पर्यटक या वास्तूंचे सौदर्य नष्ट करण्याचे काम करतात. त्यामुळे संस्कृती, इतिहासाचे साक्षीदार असलेल्या वास्तूंचे जतन, संरक्षण करण्याचे आव्हान पुरातत्व खात्यापुढे असते, असे त्यांनी यावेळी लोकमतशी बोलताना सांगितले.वसई किल्ल्यात होत असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी खात्याने कडक धोरण स्वीकारले आहे. प्रवेश शुल्कासोबतच व्यावसायिक फोटोग्राफीलाही शुल्क आकारण्यात येणार आहे. किल्ल्यात अत्याधुनिक पद्धतीचे प्रसाधनगृह बांधले जाणार आहे. किल्ल्यात प्रवेशाचे बंधन घातले जाणार आहे. यातून स्थानिक गावकºयांना सूट दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.सध्या किल्ल्यात एका सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील, फादर फ्रान्सिस कोरीया, आमची वसईचे ऋषिकेश वैद्य, पुरातत्व विभागाचे सहाय्यक अधिक्षक मनोज द्विवेदी, नगरसेविका विद्या पाटील, अलका गमज्या, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक, संरक्षक सहाय्यक कैलाश शिंदे उपस्थित होते. आठवडाभर चालणाºया कार्यक्रमात हेरीटेज वॉक, स्वच्छता अभियान, रांगोळी प्रदर्शन, निबंध, चित्रकला स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे.तर किल्ल्यातील गोन्सालो गार्सिया चर्चमध्ये चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते झाले. पेशव्यांनी वसई किल्ला काबिज करून भारतातील परकीय सत्ता उलथवून टाकण्याचा इतिहासातील पहिला पराक्रम केला. वसईकरांचा मान उंचावणाºया या घटनेचा साक्षिदार असलेला वसई किल्ल्याची वास्तू अबाधित राहिली पाहिजे. या ऐतिहासिक किल्ल्याचा अभ्यास केला तरच वसईकरांना या वास्तूचे महत्व लक्षात येईल, असे प्रतिपादन प्रथम महापौर राजीव पाटील यांनी यावेळी बोलताना केले.पर्यटकांना ऐतिहासिक माहिती मिळावी यासाठी चिमाजी अप्पा स्मारक सुशोभिकरण, थ्रीडी थिएटर, लाईट अँड साऊंड शो केले पाहिजेत. पुरातत्व विभागाने प्रस्ताव दिल्यास महापालिकेच्या वतीने ही कामे करता येतील, असेही पाटील यांनीसांगितले.>वसई किल्ल्याचे ऐतिहासिक महत्वमराठीचे व्याकरण वसईच्या किल्ल्यात शिकवले गेले. ख्रिस्तपुराणाचा अभ्यास किल्ल्यात केला गेला.वसईचा किल्ला म्हणजे ऐतिहासिक माहितीचा खजिना आहे, असे प्रतिपादन फा. फ्रान्सिस कोरीया यांनी यावेळी केले. ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण आणि जतन करण्याची शपथ यावेळी विद्यार्थीआणि उपस्थितांना देण्यात आली.

टॅग्स :FortगडVasai Virarवसई विरार