शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मीरा भाईंदर मध्ये भाड्याने देणाऱ्या अनिवासी मालमत्ता धारकांना भरावा लागणार अतिरिक्त मालमत्ता कर 

By धीरज परब | Updated: August 25, 2023 18:46 IST

२००८ नंतरची अनधिकृत बांधकामे आणि निवासी मालमत्तेचा वाणिज्य वापर करून भाड्याने दिलेल्या मालमत्ताना शास्ती सह वरील प्रमाणे कर आकारणी केली जाणार आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये दुकाने, गाळे आदी कोणतीही अनिवासी मालमत्ता भाड्याने देणाऱ्या नागरिकांना आता वार्षिक भाड्याच्या २० टक्के भाडे कर योग्य मूल्य किंवा महिन्यास १० रु. प्रति चौ. फुट यातील जी रक्कम जास्त असेल त्यानुसार महापालिकेला अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. २००८ नंतरची अनधिकृत बांधकामे आणि निवासी मालमत्तेचा वाणिज्य वापर करून भाड्याने दिलेल्या मालमत्ताना शास्ती सह वरील प्रमाणे कर आकारणी केली जाणार आहे. 

आता पर्यंत महापालिका निवासी आणि अनिवासी मालमत्ताना केवळ मालमत्ता कर आकारत होती. परंतु भाड्याने अनिवासी मालमत्ता दिली असल्यास वार्षिक भाड्या नुसार त्यावर भाडे कर योग्य मूल्य आकारले जात नव्हते. काही बँक आदी पालिकेस आधी पासूनच भाडे करारनामा नुसार भाड्यावर कर योग्य मूल्य भरत आल्या आहेत. याबाबत २० फेब्रुवारी २०१८ रोजीच्या महासभेत तत्कालीन सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी ठराव केला होता. 

त्या ठरावात बिगर निवासी मालमत्ता भाड्याने दिली असल्यास त्याला सुद्धा मालमत्ता कर आकारणीच्या जाळ्यात आणून वार्षिक भाड्याच्या २० टक्के भाडे कर योग्य मूल्य किंवा १० रु . प्रति चौ . फुट  मासिक भाडे गृहीत धरून यातील जी रक्कम जास्त असेल त्यानुसार कर वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच २००८ नंतर केलेले अनधिकृत बांधकाम भाड्याने दिले असल्यास आणि निवासी मालमत्तेचा वाणिज्य वापर करून भाड्याने दिली असेल तर त्याला देखील शास्तीसह वरील प्रमाणे कर आकारणी करण्याचे निश्चित केले होते. 

महापालिका प्रशासनाने आता त्या ठरावा नुसार अमलबजावणी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून वाणिज्य वापर चालणाऱ्या मालमत्ता धारकांना भाडेकरारनामा सादर करण्याचे लेखी पत्र कर विभागाचे सहायक आयुक्त चंद्रकांत बोरसे यांनी जारी केले आहे. ७ दिवसात भाडेकरारनामा सादर न केल्यास महापालिका अधिनियमानुसार नोटीस बजावून पुढील कायदेशीर कारवाई चा इशारा देखील बोरसे यांनी पत्रात दिला आहे. याशिवाय शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांना पत्र देऊन त्यांच्या कडे नोंदणी झालेले भाडेकरारचे दस्त सुद्धा पालिकेने मागवले आहेत. 

महापालिकेतील आकडेवारी नुसार शहरात एकूण ३ लाख ६३ हजार ९८५ मालमत्ता आहेत. त्यातील ३ लाख ३ हजार ८०७ निवासी तर ५५ हजार ६१० मालमत्ता वाणिज्य वापराच्या आहेत. ४ हजार ५६८ मालमत्ता ह्या निवासी व अनिवासी अश्या संयुक्त आहेत. वाणिज्य वापराच्या जवळपास निम्म्या मालमत्ता ह्या भाड्याने दिल्याचा अंदाज आहे. शिवाय निवासी असूनही वाणिज्य वापर करणाऱ्या मालमत्तांची संख्या सुद्धा बरीच आहे. भाड्याने दिलेल्या वाणिज्य मालमत्ताना अतिरिक्त कर आकारणी केल्याने पालिकेच्या उत्पन्नात काही कोटींची वाढ होणार असल्याचे सांगितले जाते. तर भाड्याने देणारे मालक आणि भाडेकरू यांना मात्र चांगलाच भुर्दंड सहन करावा लागणार आहे. 

टॅग्स :mira roadमीरा रोडMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक