शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पापलेटच्या पिल्लांची विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई! मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 06:03 IST

Fishing Palghar: ज्युव्हेनाईल ॲक्टची अंमलबजावणी केली जात नसल्याबाबत जिल्ह्यांतील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी  माशांच्या लहान पिल्लांची मासेमारी खरेदीबाबत अंमलबजावणी करून आपला खुलासा सादर करावा, तसेच पिल्लांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. 

- हितेन नाईक पालघर : लहान पापलेटच्या पिल्लांची बेसुमार मासेमारी होत असल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी घेतली आहे. ज्युव्हेनाईल ॲक्टची अंमलबजावणी केली जात नसल्याबाबत जिल्ह्यांतील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी  माशांच्या लहान पिल्लांची मासेमारी खरेदीबाबत अंमलबजावणी करून आपला खुलासा सादर करावा, तसेच पिल्लांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. 

पालघर जिल्ह्यासह अनेक किनारपट्टींवर पापलेटच्या लहान पिल्लांसह अनेक माशांच्या पिल्लांची मासेमारी आणि सर्रास विक्री बाजारपेठेत सुरू आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी मात्र त्याकडे कानाडोळा करत आहे. याबाबत ‘महाराष्ट्राचा राज्य मासा पालघर जिल्ह्यात संकटात’ अशा मथळ्याखाली सोमवार ३१ मार्चच्या अंकात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.  मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे यांनी ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेतली. त्यांच्या आदेशानंतर पालघर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनी परवाना अधिकाऱ्यांसह समुद्रात अल्पवयीन मासे पकडणाऱ्या ट्रॉलर्स वर कारवाई केली.

काय आहेत आदेश?केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था (सीएमएफआरआय) यांनी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ५८ मत्स्य प्रजातींच्या किमान कायदेशीर आकारमानाची शिफारस केली आहे. मत्स्य साठ्यांचे संवर्धन करण्यासाठी कृषी व पदुम विभागाने २ नोव्हेंबर २०२३ च्या शासन राजपत्राद्वारे आदेश पारित केले आहेत. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१) च्या २५ जानेवारी २०२२ च्या कलम १७ (८) अ व ब अन्वये (अल्पवयीन) जुव्हेलाइन माशांच्या मासेमारी व खरेदीवर निर्बंध घातले असून, याचे उल्लंघन केल्यास शिक्षेचे प्रयोजन केले आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारpalgharपालघर