शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘बजाज हेल्थकेअर’वर होणार कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:10 IST

तारापूर एमआयडीसी : घातक रासायनिक सांडपाणी सोडताना पकडले रंगेहाथ

पंकज राऊतलोकमत न्यूज नेटवर्क बोईसर : तारापूर एमआयडीसीतील बजाज हेल्थकेअर या कारखान्यातून गडद हिरव्या रंगाचे घातक रासायनिक सांडपाणी छुप्या पद्धतीने रात्रीच्या वेळी सोडताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) तारापूर येथील अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून कारवाईचा प्रस्ताव पाठविला आहे.तारापूर येथील प्लॉट नंबर एन -१७८ मधील या कारखान्यातून पॉझिटिव्ह डिस्चार्ज पाइपलाइनमधून एमआयडीसीच्या चेंबरमध्ये सोडण्याऐवजी छुप्या पद्धतीने टाकलेल्या ग्रॅव्हिटी पाइपलाइनद्वारे सांडपाणी सोडत असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याबाबत कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे तारापूर येथील उपप्रादेशिक कार्यालयातून पाठविण्यात आलेला आहे, मात्र प्रादेशिक कार्यालयातून कारवाईस विलंब होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे.रात्रीच्या वेळी घातक रसायन सोडणाऱ्या बजाज हेल्थ केअर या अतिप्रदूषणकारी कारखान्याचा पर्दाफाश प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला असला तरी याच कारखान्याचे चार कारखाने याअगोदरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केले आहेत. तर राष्ट्रीय हरित लवादाने कोट्यवधी रुपयांचा दंड येथील कारखान्यांवर ठोठावला असला तरी तारापूरमधील प्रदूषण बेसुमार सुरूच आहे. रासायनिक कारखान्यातून छुप्या पद्धतीने घातक रसायन कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता सोडले जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर संयुक्तपणे रात्रीच्या वेळी कारखान्यांची तपासणी सुरू केली होती. मात्र कारवाईला १५ दिवस उलटून गेले असतानादेखील प्रादेशिक कार्यालय ठाणे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे बजाज हेल्थकेअर कारखान्याला कोणत्या दबावामुळे मोकळीक दिली जाते, असा प्रश्न उपस्थित केलाजात आहे.

बजाज हेल्थकेअर कारखान्यांवर कारवाई करण्यासंदर्भात अहवाल प्रादेशिक अधिकारी ठाणे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.- मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर