शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

वसई किल्ल्यातील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 23:16 IST

वसई तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला एकमेव ठेवा म्हणजे पुरातन वसईचा नरवीर रणवीर चिमाजी अप्पाचा किल्ला परंतु,या पुरातन ठेव्याची सध्या दुरवस्था झाली असून या भागात बेकायदेशीर बांधकामांनी बऱ्यापैकी आपले डोके वर काढले आहे.

वसई - वसई तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला एकमेव ठेवा म्हणजे पुरातन वसईचा नरवीर रणवीर चिमाजी अप्पाचा किल्ला परंतु,या पुरातन ठेव्याची सध्या दुरवस्था झाली असून या भागात बेकायदेशीर बांधकामांनी बऱ्यापैकी आपले डोके वर काढले आहे. दरम्यान या तक्र ारी ची दखल घेऊन आता येथील केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने कंबर कसली असून येथे अनिधकृत बांधकाम करणाऱ्यां विरोधात वसई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.वसईच्या किल्ल्याला दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी हौशी पर्यटक, ट्रेकर्स, इतिहासकार, जाणकार व किल्लेप्रेमी भेटी देत असतात.एका बाजूला असलेली वसई- नायगाव ची खाडी तर दुस-या बाजूला स्थानिक कोळी बांधवांची गावे त्यामुळे येथे पर्यटकांची सतत रेलचेल असते. मात्र या वसई किल्ल्यात सध्या अनिधकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे.एकूणच वसई किल्ल्याच्या संरिक्षत क्षेत्रा मधील तटबंदीच्या आत तीन व्यक्तींनी व किल्ल्याच्या तटबंदी बाहेर १०० मीटरच्या आत कस्टम कार्यालया जवळ अनिधकृत बांधकाम केले आहे. पुरातत्व विभागाने त्या विरोधात पोलिसांत सहा जणांवर गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये वर्षा डवले, सुनीता कदम, गुरु दत्त डवले, हेमा तुमडे, गडसन धोकडू आण िमोसेज इवा अशी आरोपींची नावे असून त्यांनी कस्टम कार्यालया जवळ तसेच किल्ल्याच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ आण िकिल्लाबंदर वसई येथे बांधकाम केल्याचे पुरातत्व विभागाने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्र ारीमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी प्राचीन स्मारक व पुरातत्वीय स्थळे तथा अवशेष नुसार गुन्हे नोंद केल्याचे पोलिस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी सांगितले.वसई किल्ल्यात झालेल्या अनिधकृत बांधकामांबद्दल वेळोवेळी पुरातत्व विभागाला कळविले असून त्याबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने या अनिधकृत बांधकाम करणाºयां विरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. तसेच किल्ल्यात इतर ठिकाणी झालेल्या अनिधकृत बांधकामांवर देखील कारवाई करण्यात यावी आणि ती देखील भुईसपाट करावी जेणेकरून किल्ल्याला लागलेले गालबोट नाहीसे, होईल अशी आम्हा इतिहास अभ्यासकांची मागणी राहिली आहे.-डॉ. श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFortगड