शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू; प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 00:01 IST

प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल : सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी अचानक भेट देण्याचे यंत्रणेला आदेश

पालघर/बोर्डी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या अनुषंगाने शनिवार, २० फेब्रुवारीपासून जिल्ह्यात विविध भागांत प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली असून विनामास्क नागरिकांना २०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी अचानक भेटी देण्याचे आदेश प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत.

पालघर जिल्ह्यात कोरोना नियमांत शिथिलता देण्यात आल्यानंतर नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढलेली दिसून येऊ लागली असून अनेक लोक विनामास्क फिरत आहेत. यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या अनुषंगाने आता मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस, खाजगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा/महाविद्यालये, बँक्वेट हाॅल, रेस्टाॅरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, शाॅपिंग माॅल्स, धार्मिक स्थळे, उद्याने, बाजाराची ठिकाणे येथे वेळोवेळी अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात यावी.

तपासणी करण्यात येणाऱ्या ठिकाणी कोविड नियमांचा भंग केला असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, तसेच मास्कचा वापर न करणाऱ्या लोकांवर २०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे आदेश प्रशासनाने यंत्रणेेला दिले आहेत. याकरिता तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांचा समन्वय ठेवून एकत्रितरीत्या कारवाई करावी, असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान,  जिल्हाधिकारी यांनी याबाबत कडक धोरण अवलंबिण्याचे आदेश काढल्यानंतर जोरात कारवाई सुरू झाली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली. त्यानुसार कोविड नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpalgharपालघर