वसई : नायगाव येथील रश्मी बिल्डरच्या पिंंक सिटीवर कारवाई करण्यास मनाई करण्यास कोर्टाने नकार दिवाळीनंतर येथील अनधिकृत बांधकामाविरोधात वसई विरार पालिका कारवाई करणार आहे. दिवाळी असल्याने पालिकेने कारवाई थांबवली आहे.नायगांव परिसरातील सर्वे क्रमांक ३५६ या भुखंडावर रश्मी बिल्डर्स या विकासकाने पिंंकसिटी ही इमारत उभारली आहे. सदर इमारतीला पालिकेची परवानगी असली तरी पालिकेच्या प्रस्तावित बांधकामानुसार तथा आराखड्यानुसार न केली गेल्याने शुक्रवारी वालिव अतिक्रमण विभागाने सदर इमारतीवर कारवाईसाठी आपला फौजफाटा पाठवला होता. मात्र तेथील रहीवाशांनी विरोध केल्याने पालिका अधिकाऱ्यांना हात हालवत परतावे लागले होते. यावेळी न्यायालयाने दिवाळीत सामान्यांचे संसार उघड्यावर पडू नयेत, म्हणून १० ते १२ दिवसांची मुदत वाढवून दिल्याचे रहीवाशांनी पालिका अधिकाऱ्यांना सांगीतले होते. मात्र, पालिका अधिकाऱ्यांनीही रहीवाशांकडून मुदतवाढीची प्रत न मागताच परत जाणे पसंत केले. सद्या पिंंकसिटी या इमारतीत ३ विंंग आहेत. पैकी २ विंग रिकाम्या असून १ विंगमध्ये १५ कुटूंबें राहतात. पालिकेच्या प्रस्तावित आराखड्याला छेद देत सदर पिंकसिटीचे बांधकाम केले गेल्याने दिवाळीनंतर या इमारतीवर पालिकेच्या कारवाईचा हातोडा पडणार आहे. या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे पालिका येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार आहे. पण, दिवाळी असल्याने पालिकेने कारवाई थांबवली असून दिवाळीनंतर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)हायकोर्टाने जर स्टे नाकारून कारवाई करण्यासाठी मनपाला आदेश दिला असेल तर नियमाप्रमाणे मनपा कारवाई करणार. कोणत्याही प्रकारे कोर्टाचा अवमान होणार नाही याची काळजी घेणार. -सतीश लोखंडे, आयुक्त, वसई विरार मनपाआमच्या इमारतीवर राजकीय दबावामुळे होणारी मनपाकडून कारवाई चुकीची आहे. - अशोक भोसमीया, रश्मी बिल्डर्सपिंंकसिटीचे बांधकाम हे प्रस्तावित बांधकामानुसार नाही. विकासक रश्मी बिल्डर याने न्यायालयात जाऊन आपल्या बांधकामावर कारवाई होऊ नये म्हणून स्थगिती अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला आहे. दिवाळीनंतर सदर बांधकामावर पोलिस फौजफाट्यासह कारवाई करणार आहोत. -गिल्सन घोन्सालवीस, सहाय्यक आयुक्त
नायगाव येथील पिंंक सिटीवर दिवाळीनंतर कारवाई
By admin | Updated: October 30, 2016 02:24 IST