शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

अहवाल आल्यानंतरच दोषींवर कारवाई - सावंत

By admin | Updated: February 28, 2016 04:05 IST

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, कासा बुद्रुकमधील २५४ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून गुरुवारी झालेल्या विषबाधा प्रकरणी अन्नाच्या तपासणीचे नमूने आल्यानंतरच

विक्रमगड : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, कासा बुद्रुकमधील २५४ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून गुरुवारी झालेल्या विषबाधा प्रकरणी अन्नाच्या तपासणीचे नमूने आल्यानंतरच संबंधीतांवर कारवाई केली जाईल अशी स्पष्टोक्ती आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी येथे केली. यावेळी त्यांच्या समवेत आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार अमित घोडा, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट, जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.२५४ विद्यार्थ्यांपैकी एकूण १५२ विद्यार्थ्यांना अन्न विषबाधेची लक्षणे दिसून न आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तसेच १०९ विद्यार्थ्यांना निरिक्षणार्थ उपजिल्हा रुग्णालय, कासा येथे दाखल करून घेण्यात आले असून त्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थीर असल्याचे वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, कासा यांनी सांगितले.ही विषबाधा इस्कॉनने पुरविलेल्या आहारातून झाल्यामुळे इस्काँन फुड रिलीफ फाउंडेशन वाडा विरुद्ध मुख्याध्यापक भोये यांनी निष्काळजीपणाची तक्रार दाखल केली. ती वरून कलम २५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)