शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

पाणथळ जागेवरील अतिक्रमणावर कारवाई;  १९ कोळंबी प्रकल्प तोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 00:50 IST

पर्यावरण संवर्धन समितीच्या आंदोलनाला यश

वसई : वसईच्या रानगाव आणि भुईगाव (ता. वसई) येथील पाणथळ जागेवरील पर्यावरणाचा ºहास करणाऱ्या अनधिकृत कोळंबी प्रकल्पावर मंगळवारी सकाळी वसई महसूल विभागाने महापालिका आणि वसई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली. येथील १९ कोळंबी प्रकल्पांवर १२ जेसीबीच्या सहाय्याने तोड कारवाईला सुरूवात केली आहे.

२ डिसेंबरपासून सलग चार दिवस वसई पर्यावरण संवर्धन समिती आणि अनेक सामाजिक संस्था, संघटना आदी पर्यावरणप्रेमी संघटनांनी वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर उपोषण केले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत अखेर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी पालिका, महसूल, महावितरण आणि पोलीस विभागाची एक संयुक्त बैठक घेऊन १० डिसेंबर पासून येथील सरकारी तसेच पाणथळ जागेवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात करेल, असे लेखी आश्वासन देत हे आंदोलन स्थगित केले गेले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या लेखी आश्वासनाची पूर्तता करताना वसई महसूल विभागाने येथील रानगाव आणि भुईगाव किनारपट्टी भागात २००० पासून उभ्या असलेल्या एकूण १९ कोलंबी प्रकल्पांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली. या कोलंबी प्रकल्पात ९ प्रकल्प हे रानगाव सोसायटीचे तर १० खाजगी व्यक्तीचे असल्याचे वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मंगळवारी सकाळी ६ वा. या कारवाईला सुरुवात झाली. येथील बांध आणि बंधारे तोडून याचे पाणी समुद्राला वळवले. या एकूणच कारवाईत वसई तहसीलदारांसहीत महसूल कर्मचारी अधिकारी, मनपाचे ५० हून अधिकारी आणि ७० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महावितरणचे कर्मचारी, अभियंता हे या संयुक्त कारवाईत सहभागी झाले होते.

या कारवाईमुळे जरी आंदोलनकर्ते आणि पर्यावरण प्रेमींचे जरी समाधान झाले असले तरी या प्रकल्पात काम करणारे जवळपास २ हजार ५०० हून अधिक मजूर वर्ग आता रोजगारापासून वंचित झाला आहे. यापुढे ही तोड कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रांतांनी स्पष्ट केले.या सरकारी पाणथळ जागेवरील कारवाईबाबत रानगाव आणि भुईगाव येथे बºयापैकी मोठे बेकायदेशीर कोलंबी प्रकल्प होते. यात १९ पैकी ३ खाजगी व्यक्तींनी न्यायालयाचे स्थगिती आदेश घेतले. आजच्या पालिका, महसूल आणि पोलीस, महावितरण यांच्या संयुक्त कारवाईत १५ ते १६ प्रकल्पांवर १२ जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करून बांधबंधारे उद्ध्वस्त करत ते पाणी समुद्राकडे वळवले आहे. यापुढेही अशी कारवाई सुरू राहील.- किरण सुरवसे, वसई तहसीलदार 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार