शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वसईमध्ये १,०७,६५३ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:58 IST

तालुक्यातील बेशिस्त वाहनचालकांना दंड : ४ कोटी ८४ लाख ४७ हजार वसूल

मंगेश कराळेn  लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : वसई तालुक्यात वाहतूक विभागाला तुटपुंज्या कर्मचारीवर्गासह वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. वसई वाहतूक विभागाने पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली वसई, नालासोपारा, विरारच्या मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करून गेल्या ९ महिन्यांत १ लाख ७ हजार ६५३ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून ४ कोटी ८४ लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने व अन्य वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान वाहतूक विभागासमोर उभे ठाकलेले आहे. वाहनचालक सर्व कायदे पायदळी तुडवत मनाला वाटेल त्या ठिकाणी आपली वाहने पार्किंग करतात. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने विरोध केल्यावर वाहनचालक हुज्जत घालून शिवीगाळ करत मारहाण केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. काही वेळा राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे कारवाई करण्यास अडचणी निर्माण होतात. तरीही तुटपुंज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहतूक विभागाने हार न मानता गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कारवाई करण्यासाठी कंबर कसून कोट्यवधींचा दंड वसूल केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वसई वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विलास सुपे, पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

वाहतुकीवर नियंत्रण राखतात ७६ पोलीसवसई तालुक्याच्या विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव या चार शहरांतील रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडी रोखण्यासाठी फक्त ७६ वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. तुटपुंज्या पोलीस 

कोरोनामुळे रेल्वे वाहतूक बंद असल्याने रस्ते वाहतुकीत वाढ झाली आहे. आयुक्तालय झाल्याने वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गाची संख्या लवकरच वाढणार आहे. लॉकडाऊन काळात १ लाखापेक्षा जास्त केसेस केल्या आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला असलेली भंगार वाहने उचलून एका ठिकाणी जमा करण्यात आली आहेत. अनधिकृत रिक्षा, बिनापरवाना, फॅन्सी नंबर, नंबर न टाकलेल्या वाहनांवर नेहमी कारवाई सुरू आहे.- विलास सुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसईबळावर वाहतूककोंडी रोखण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ होते. लाखोंच्या घरात असलेली लोकसंख्या आणि त्यांची रस्त्यावर धावणारी वाहने या सर्वांसाठी तुरळक वाहतूक पोलीस असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Policeपोलिस