शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

अभिनय स्पर्धेत पाटील प्रथम

By admin | Updated: April 1, 2017 05:13 IST

वसईत झालेल्या पहिल्या स्व. नाना वळवईकर स्मृती वैयक्तीक अभिनय स्पर्धेत वसईच्या अंजली पाटीलने

वसई : वसईत झालेल्या पहिल्या स्व. नाना वळवईकर स्मृती वैयक्तीक अभिनय स्पर्धेत वसईच्या अंजली पाटीलने बाजी मारली. मुंबईच्या रुचिका राऊतने द्वितीय तर नालासोपारा येथील नितेश भोंडवे याने तिसरा क्रमांक पटकावला. सागर भांडारकर आणि कल्याणी बागवाले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अनिल बांदीवडेकर , अभिनेते अनिल गवस, ज्येष्ठ नेते उद्धव घरत यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धाप्रमुख विलास पागार यांनी वसई तालुक्याच नाट्यविषयक घडामोडींचा आढावा घेतला. वसई तालुक्याला साहित्य व नाट्य कलेचा मोठा वारसा लाभला आहे. इकडे सतत काही तरी नवे घडत असते. मोठे उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक कार्यकर्त्यांची फळी याठिकाणी आहे. नेतेसुद्धा उपक्रमांच्या पाठीशी असतात. नटश्रेष्ठ दत्ताराम यांचा वारसा चालवणारे नव्या पिढीचे कलावंत आहेत, असे डॉ. अनिल बांदीवडेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. वसईत नाट्यविषयक संशोधन केंद्र निर्माण व्हावे. वस़ईसह राज्यातील नाट्य-चित्रपट क्षेत्रातील नव्या-जुन्या काळातील घडामोंडीचा, वाटचालींचा अभ्यास व्हावा. संशोधन कार्याला भरपूर वाव असल्याचेही बांदीवडेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.ज्येष्ठ साहित्यिका वीणा गवाणकर, अभिनेते हेमंत राऊत, नाट्यलेखक रमाकांत वाघचौडे, देवव्रत वळवईकर, अशोक वळवईकर, नाना वळवईकर, प्रकाश वनमाळी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)स्पर्धक होते चाळीसवसईतील अमर कला मंडळ व वसई तालुका कला क्रीडा महोत्सव समितीने ही स्पर्धा आयोजित केली होती. राज्यभरातून १०४ प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील पहिल्या ४० स्पर्धकांना प्रवेश देण्यात आला होता. ज्येष्ठ रंगकर्मी हेमंत भालेकर, रेखा बडे, डॉ. तुळशी बेहरे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.