शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, ५ गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2023 17:44 IST

आरोपीकडे तपासादरम्यान आयुक्तालयातील घरफोडीचे व ईतर चोरीचे असे ५ गुन्हे उघड केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- घरफोडी, चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून ५ गुन्ह्यांची उकल करून ४ लाख ९४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.

नायगावच्या वाकीपाडा रामधाम आश्रम समोर महादुर्गा वेल्फेअर सोसायटीत राहणाऱ्या मालती यादव यांच्या घरी २५ सप्टेंबरला चोरट्याने घरफोडी केली होती. घरातील कपाटातून सोन्याची अंगठी, सोन्याचे मणी, घड्याळ असा २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये सतत होणाऱ्या घरफोडी चोरींचे प्रमाण वाढत असल्याने घरफोडी चो-यांवर आळा घालण्याचा सूचना वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

त्या अनुषंगाने घडणा-या घरफोडी चोरीच्या गुन्हयाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून माहीतीचे व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस घेत होते.  त्यानुसार नायगाव पोलीस ठाण्यातील घरफोडी चोरीच्या गुन्हयांतील आरोपीच्या नावाची उकल करुन सापळा रचुन आरोपी धिरज गुलाब मौर्या (२०) याला ताब्यात घेतले.  त्याचेकडे तपास केल्यावर सदर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीकडे तपासादरम्यान आयुक्तालयातील घरफोडीचे व ईतर चोरीचे असे ५ गुन्हे उघड केले आहे. अटक आरोपीकडुन उघडकीस आणलेल्या ५ गुन्हयातील ४ लाख ९४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार संजय नवले, रमेश भोसले, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, दादा आडके, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे, सायबर शाखेचे संतोष चव्हाण, म.सु.ब. अविनाश चौधरी, रामेश्वर केकान यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी